संविधान जाळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा!

0
25

गोंदिया/भंडारा,दि.11 : दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकंकटांनी भारतीय संविधान जाळले. संविधान मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. बाबासाहेब यांच्याविषयी अनादर व्यक्त केले. सदर कृत्य हे बेकायदेशिर असल्याची माहिती असूनही या कृत्याचे व्हीडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. अशा माथेफिरुंविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटना व संविधान प्रेमींनी निवेदनातून केली आहे.गोंदिया येथे शहर पोलीस ठाण्यात सर्वपक्षीय नेत्यांनी तक्रार नोंदविली.त्यावेळी माजी सभापती घनश्याम पानतवणे,संदीप ठाकूर,देवा रुषे,संकल्प खोब्रागडे,भालेराव आदी उपस्थित होते.

तिरोडा येथे संविधानाचा अवमान करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. माजी आमदार दिलीप बन्साेड, माजी आमदार भजनदास वैद्ये, म.प्र.बु.विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये, नगरसेवक विजय बन्सोड, राजेश गुनेरिया, माजी नगरसेवक प्रशांत डहाडे, जितेंद्र डहाटे, वंदना चव्हाण, पंचशिला रामटेके शहरातील गणमान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भंडारा : भंडारा येथील संविधान प्रेमींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी मंगेश श्यामकुवर, आरपीआय (आ) चे जिल्हाध्यक्ष असित बागडे, सामाजिक कार्यकर्ते अमृत बन्सोड, सुशिल नगराळे, दिनेश गोस्वामी, आनंदराव मेश्राम, विनीतकुमार देशपांडे, अप्रोज खान, आतिश बागडे, शैलेश मेश्राम, अजय मेश्राम, गुलशन गजभिये, प्रशांत सूर्यवंशी, श्रद्धा डोंगरे, भावना रंगारी, सविता इलमकर, डॉ.ज्योती गणवीर, मंजुषा चव्हाण, स्नेहल मेश्राम, प्रशांत गजभिये, अश्विन गोस्वामी, धनंजय बर्वे, दर्शन बागडे, सुरज भालाधरे, योगीराज भालाधरे, सुहास गजभिये, एस.एस. बोरकर, हिवराज उके, इंजि. रुपचंद रामटेके यांच्यासह अनेक संविधानप्रेमी उपस्थित होते.युथ पँथर युवा सामाजिक संघटनेच्या वतीने ठाणेदार मधुकर चव्हाण यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष तेजपाल मोरे, महासचिव उमेश हरदास, उपाध्यक्ष मोरेश्वर राऊत, भंडारा जिल्हाध्यक्ष राहुल बांते, भंडारा शहराध्यक्ष दिनेश मेश्राम, सत्यपाल मोरे, रजत खोब्रागडे, राष्ट्रपाल मोरे आदी उपस्थित होते.
लाखनी : लाखनी येथे दिनेश वासनिक यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सोपविण्यात आले. यावेळी उमेश गोस्वामी, अनिल चचाने, अतुल वाघाये, रवी चेटुले, कमलेश नेवारे, दीपक झलके, विरेंद्र सोनवाने, कमलेश मेश्राम, बंटी वैद्य आदी उपस्थित होते.