ब्रम्हपुरी जिल्हा मागणीसाठी धरणे आंदोलन

0
19

ब्रह्मपुरी,दि.12ः- विदर्भ राज्य समन्वय समिती व ब्रम्हपुरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने विदर्भ राज्य झाले पाहिजे आणि ब्रम्हपुरी जिल्हा झाला पाहिजे या दोन्ही मागण्यासाठी धरणे आंदोलन कार्यक्रम दिनांक ९ ऑगष्ट रोजी गुरुवार ला शिवाजी चौक ब्रम्हपुरी येथे करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. गोविंद भेंडारकर होते, विदर्भ राज्य झाला पाहिजे तसेच ब्रम्हपुरी जिल्हा झाला पाहिजे याकरिता मत व्यक्त केले तसेच हरिशचंद्र चोले यांनी आपले मत मांडले तसेच संचालन प्रा. लक्ष्मण मेश्राम यांनी केले. त्याचप्रमाणे डॉ. प्रेमलाल मेश्राम , सुधाताई राऊत , विनायक रामटेके, सुदाम राठोड, इत्यादींनी मार्गदर्शन केले,उपस्थित असलेले मान्यवर सुधीर सेलोकर, डॉ. विलास ज्ञानेश्‍वर जोगे, वासुदेवराव कढिखाये, योगेश नंदनवार, फाल्गुन राऊत, तुकाराम चोले, सिद्धार्थ मेर्शाम, हनुमंतराव राऊत, महेश कोलते, रामजी चिलबुले, रमेश रणदिवे, करंबे संजय हटवार, अनिल शेंडे आदि उपस्थित होते.