स्वच्छ सर्वेक्षण समितीची केशोरी व बोंडगाव/सूरबन ग्रा.पं.ला भेट

0
4

अर्जुनी मोरगाव,दि.12ः- भारत सरकारच्या केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे देशातील संपूर्ण जिल्ह्यात ‘स्वच्छ सर्वेक्षण’ कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने समितीकडून (दि.९) अजुर्नी मोरगाव तालुक्यातील केशोरी व बोंडगाव सुरबन या ग्रामपंचायतीची पाहणी करण्यात आली. जिल्ह्यातील अशा १0 ग्रामपंचायतींची तपासणी होणार असून यावर गुणांकन ठरणार आहे. या सर्वेक्षणात उत्कृष्ट ठरणार्‍या जिल्ह्याचा २ ऑक्टोबर रोजी सन्मान करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत प्रामुख्याने शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथ. आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आठवडी बाजार, धार्मिक स्थळ या ठिकाणाची पाहणी करूण सर्वेक्षण करण्यात आले. यासह गावातील नागरिकांची स्वच्छता विषयक प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदविली जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत गावाचे सरपंच स्वच्छतागृह ग्रा.पं. सदस्य, देखरेख समिती सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व शिक्षकांच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण करण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २0१८ मध्ये देशभरातील ६९८ जिल्हे सहभागी असून प्रत्येक जिल्ह्यामधून १0 गावे, याप्रमाणे ६ हजार ९८0 गावांचा समावेश राहणार आहे. यात महाराष्ट्रातील ३४0 गावांमध्ये हे सर्वेक्षण केले जाणार आहे. तर देशभरातील एकूण ३४ हजार ९00 सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. केशोरी व बोंडगाव/सूरबन ग्रामपंचायतीची ईश्‍वर काटेखाये, रजनीकांत घरडे, जितेंद्र पारधी, तुषार गायकवाड यांचा समावेश असलेल्या चार सदस्यीय समितीने गावाचे सर्वेक्षण केले. यावेळी पं. स. चे खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, बालविकास प्रकल्प अधिकारी अमृत सरडे, जि. प. सदस्य तेजुकला गहाणे, पं. स. सदस्य अर्चना राऊत, सुशिला हलमारे व दोन्ही गावाचे सरपंच ग्रा.पं. सदस्य ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.