युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात

0
10

नागपूर,दि.14: युवा भोयर-पवार मंचचा ११ वा वार्षिक महोत्सव कुकडे ले-आऊट येथील पवार विद्यार्थी भवनात पार पडला. उद्घाटन अखिल भारतीय भोयर पवार महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन,डी.राऊत, अभियंता मुरलीधर टेंभरे यांच्या हस्ते करण्यात आले. पूथ्वीराज रहांगडाले, बंडू पराडकर, एस.एम.पारधी, तुलाराम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. संज़य नाथे, अजय खवसे यांनी मार्गदर्शन केले.
समाजातील गुणवंत व गरजू विद्याथ्र्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. यासोबतच गुणवंतप्राप्त विद्यार्थी, प्रतिभावंत, समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. जयश्री चौधरी, डॉ. उदय चौधरी,राजेंद्र चौरागडे यांच्या मार्गदर्शनात रोगनिदान तर आयुष ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिविर घेण्यात आले.प्रास्ताविक युवा भोयर-पवार मंचचे अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी केले. संचालन अंजू देवासे यांनी केले. विलास डिप्रसे यांनी आभार मानले. आयोजनासाठी सुरेश देशमुख, मुकेश चोपडे, अजय फरकाडे, प्रेमराज गोहले, गौरव धारपुरे, हरीश ढोबाळे, लालचंद चौधरी, नंदू रबडे, शालिनी देशमुख, भारती देशमुख, विजया गद्रे, शुभांगी फरकाडे, पदमा खवसे, सीमा चव्हाण, विककी बत्रगरे, तीर्थराज बोबडे, प्रशांत पठाडे, मंदा फरकाडे, सुवर्णा धन्नगरे, साधना फरकाडे, सुनीता गोहते, मीनाक्षी टेंभरे आदिंनी सहकार्य केले.