दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम

0
12

गोंदिया,दि.14: विदर्भाताली पातुर तालुक्यातील झरंडी गाव नेहमीच दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जायचे.उन्हाळ्यात तर गावात पाण्याची भिषणता एवढी की दररोज एैवजी दोन तीन दिवसांनी टॅंकरने पाणी मिळायचा.यामुळेच गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी डोंगराळ भागात वसलेल्या झरंडी गावातील ग्रामस्थांनी निर्धार केला आणि ग्रामस्थांच्या एकीच्या बळावर अमीर खानच्या पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गाव पाणीदार केले. ग्रामस्थांनी केलेले हे परिश्रम सार्थकी लागते. या गावाने तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा पंधरा लाख रुपयांचा पुरस्कार पटकावला.त्या पुरस्काराचा मान गावच्या नागरिकांनी आपल्या गावातील अधिकारी असलेल्या मुलालाही दिला हा त्यांच्या गावातील केलेल्या कार्याचा गौरवच म्हणावा लागणार आहे.ते अधिकारी म्हणजे नागपूर पंचायत समितीचे विद्यमान सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष जाधव होत.
पातूर पंचायत अंतर्गत एकूण ५७ ग्रा.पं.असून त्यापैकी पाणी फाऊंडेशनद्वारा आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये पातूर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीने सहभाग घेतला होता. त्यामध्ये ३३ ग्रापंने प्रशिक्षण पूर्ण केले. तर १४ ग्रा.पं.नी कामे पूर्ण केली व पाच गावे शर्यतीमध्ये होती. त्यापैकी पातूर तालुक्यातील झरंडी या गावाला १० लाख रुपयाचे प्रथम बक्षीस मिळाले तर बोडखा या गावाला पाच लाख रुपयांचे द्वितीय बक्षीस आणि चतारी या गावाला तीन लाख रुपयांचे तृतीय बक्षीस मिळाले. हा बक्षीस वितरण सोहळा पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये १२ ऑगस्टला पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पाणी फाऊंडेशनचे प्रमुख अभिनेते आमिर खान, जलसंधारण मंत्री राम शिंदे, किरण राव, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज ठाकरे, विखे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते झरंडी येथील सरपंच पत्नी ललीता मखराम राठोड व गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी पुरस्कार स्विकारला.
विशेष म्हणजे झरंडी गावचे रहिवासी असलेले नागपूर पंचायंत समितीचे विद्यमान सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष जाधव उन्हाळ्याची सु्टटी असो की इतर सुट्टीच्या वेळी गावाला जायचे.अशातच यावर्षी जन्मगावी भेट दिली. आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्यावतीने दुष्काळग्रस्त गावांत  वाॅटर कप स्पर्धेला सुरुवात झाली होती. गावकèङ्मांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता.ग्रामसेवकासह फाऊंडेशनचे स्वयंसेवकही समजविण्याचा प्रयत्न करीत होते.त्याचदरम्यान जाधव हे गावात असताना त्यांना ग्रामसेवकासह सर्वांनी गळ घातली आणि त्यांनी गावकर्यांशी संवाद साधत श्रमदानाचे महत्व आणि आपल्या गावात असलेल्या पाणीटंचाईचे वास्तव्य पटवून दिले.त्यांच्या या भूमिकेला सुरवातीला काही नागरिकांनी समर्थन देत श्रमदानातून बोळीचे काम करण्यास सुरवात केली आणि हळूहळू पुर्ण गावच या अभियानात सहभागी झाले.डोंगराळ भागात असलेल्या झरंडी गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून अनेक कामे पूर्ण केली. यामध्ये नाला खोलीकरण, सीसीटी, डीप सीसीटी, एलबीएन एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी २५ हेक्टरमध्ये कंटुर बांध उभारले आहेत. तसेच सहा वनराई बंधारे, १० शेततळे व जुन्या रसत्याची दुरुस्ती इत्यादी कामे गावचळवळीतून एकजुटीने करण्यात आली.त्या सहभागाची जाण गावातील नागरिकांनी आणि पदाधिकारी यांनी ठेवत आपल्या पुरस्काराच्या श्रेयात सुभाष जाधव यांना दिलेला वाटा हा त्यांच्या कार्याला सलाम करणारा ठरला आहे. जेव्हा आपल्या गावचा एक अधिकारी असलेला मुलगा श्रमदान करतो हे गावकèङ्मांनी बघितले आणि त्यांच्या सोबतीला धावून आले. जाधव यांनी कृतीतून केलेल्या कामाची नोंद घेत पाणी फांऊंडेशनने झरांडी गावाला जेव्हा प्रथम पुरस्कार जाहिर झाले. तेव्हा त्यांनाही आमंत्रण दिले.
झरंडी हे गाव पातूरपासून ४० कि.मी. अंतरावरील डोंगराच्या पायथ्याशी आहे. आपल्या गावातील नागरिकांच्या एकीच्या बळावर व श्रमदानाच्या बळावर तसेच शासनाच्या व भारतीय जैन संघटनेच्या मदतीने आपले गाव पाणीदार केले. त्यासाठी तालुका समन्वयक सुभाष नानोटी, मंगेश निमकंडे व झरंडी ग्रा.पं.चे ग्रामसेवक पी.पी. चव्हाण तथा ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.

.