युवा माहिती दूत शासन व समाजामधील दुवा – ना. महादेव जानकर

0
11

भंडारा,दि.16 :- युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने युवा माहिती दूत हा उपक्रम हाती घेण्यात आला असून युवा माहिती दूत हे शासकीय योजनांचे लाभार्थी व शासन या मधील दुवा ठरतील, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री ना. महादेव जानकर यांनी व्यकत केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या युवा माहिती दूत या उपक्रमाच्या लोगोचे प्रकाशन स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात ना. महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर आयोजित कार्यक्रमात युवा माहिती दूत चित्रफित मंत्री तसेच अधिकारी यांना दाखविण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
जास्तीत जास्त युवकांनी युवा माहिती दूत हे मोबाईल अप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन युवा माहिती दूत  व्हावे, असे आवाहन ना. जानकर यांनी केले.
जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उप जिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.