पूर्ण क्षमतेने मिळणार धापेवाडा योजनेचे पाणी

0
9

तिरोडा ,दि.17: येथील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी अनेक गावातील शेतीस योग्य प्रमाणात मिळत नसल्याच्या तक्रारीवरून आमदार विजय रहांगडाले यांनी १५ ऑगस्ट रोजी वीज वितरण कंपनी, उपसा सिंचन योजनेचे सिव्हिल व इलेक्ट्रीक विभागाचे अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करून दोन्ही विभागाचा समन्वय साधून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. .

अनेक शेतकऱ्यांच्या मागणीवरून आमदार विजय रहांगडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीकरिता सोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्यावरून ५ ऑगस्टपासून या योजनेचे पाणी सोडण्यास आले. परंतु १० दिवस होऊनही मरारटोला, पुजारीटोला, लोधीटोला, घाटकुरोडा आदी गावात योग्य प्रमाणात पाणी मिळाले नसल्याचे समजल्यावरून आ. रहांगडाले यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता वीज वितरण कंपनीकडून कमी व्होल्टेज मिळत असल्याने सर्व पंप सुरू नसल्याने पूर्ण दाबाने पाणी देता येत नसल्याचे सांगितल्यावरून १५ ऑगस्ट रोजी आमदार विजय रहांगडाले यांनी चिरेखनी नहर, पावर हाऊस व पंप हाऊस येथे धापेवाडा योजनेचे कार्यकारी अभियंता पी.एम. फाळके, उपअभियंता पंकज गेडाम, अहीरराव इले्ट्रिरक विभागाचे उपअभियंता गायधने, वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सुनील माहुर्ले, रमाकांत खोब्रागडे, राधेश्याम नागपुरे, भाजपा महामंत्री नीरज पटले, धीरज बरीयेकर, पं.स. सदस्य पवन पटले, बाजार समिती संचालक घनश्याम पारधी व काही शेतकऱ्यांसह पाहणी केली असता वीज वितरण कंपनीतर्फे योग्य प्रकारे वीज पुरवठा होत असलातरी उपसा सिंचन योजनेचे सब स्टेशनमधून योग्य प्रकारे वीज पुरवठा होत नसल्याने २ पंप बंद असल्याचे दिसून आल्याने त्वरित वीज वितरण कंपनी व धापेवाडा योजनेच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयाने वीजपुरवठा सुधारून सर्व पंप सुरू केल्याने आता सर्वत्र योग्य प्रमाणात शेतीकरिता धापेवाडा सिंचन योजनेचे पाणी मिळणार आहे. .