मुख्य बातम्या:
काँग्रेस नेते पटोलेंच्या नेतृत्वात धडकला जनआक्रोश मोर्चा# #लाखाची लाच घेतांना उपअभियंता जाळ्यात# #ओबीसीच्या मुद्द्यावर भाजप लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे पडले-आ.विजय वडेट्टीवार# #वेतन कपात प्रश्नी, सीईओची मुख्य सचिवाकडे तक्रार करणार# #पालकमंत्री संजय राठोड यांचा आज वाशिम जिल्हा दौरा# #स्वाभिमानी शेतकरी संघटना करणार राज्यभर आंदोलन# #कुष्ठरुग्ण शोध अभियान यशस्वीतेसाठी जनतेनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे# #युवकावर चाकुने वार केल्या प्रकरणी युवतीवर नागभीड पोलीसांनी केला गुन्हा दाखल# #ओबीसी गैरआदिवासीच्या अन्यायाविरोधात ओबीसी युवा महासंघाने केली निर्णयाची होळी# #आलापल्ली-भामरागड मार्गावर आढळले नक्षली बॅनर

तालुक्यातील ४ ठिकाणी नळयोजनेचे भूमिपूजन

देवरी,दि.19ःःग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प. गोंदिया अंतर्गत उपविभाग देवरीच्या वतीने शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमात देवरी तालुक्यातील शिरपुरबांध, भरेर्गाव, पिंडकेपार व सावली या गावात नवीन नळ योजनेचे भूमिपूजन सोहळा १४ ऑगस्ट रोजी पार पडला.
भूमिपूजन आ. संजय पुराम यांच्या हस्ते जि.प. अध्यक्ष सीमाताई मडावी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प. उपाध्यक्ष हमीद अल्ताफ अकबर अली, महिला बालकल्याण सभापती लताताई दोनोडे, जि.प. सदस्य उषाताई शहारे, सरिता रहांगडाले, दिपकसिंग पवार, माधुरी कुंभरे, पं.स.सभापती सुनंताताई बहेकार, उपसभापती गणेश सोनबोईर, पं.स.सदस्य महेतरलाल कोराम, महेंद्र मेर्शाम, सरपंच नरसिंह फन्डकी, उपसरपंच दुर्योधन शिवणकर, भरेर्गावचे सरपंच विद्याताई खोटेले, उपसरपंच मनोज मिरी, पिंडकेपारचे सरपंच प्रमिलाताई घासले, उपसरपंच येनुबाई घोगारे, सावलीचे सरपंच प्रभु पवार, उपसरपंच निलेश शेंडे, पोलिस पाटील चंद्रसिंग रहांगडाले, देवरीचे नगरसेवक यादवराव पंचमवार तसेच चारही गावातील ग्रा.प.सदस्य व ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग देवरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या चारही गावात एकूण १ कोटी ७७ लाख रुपयाचे निधीतून नळ योजनेचे काम केले जाणार आहे. कार्यक्रमाचे संचालन एस.व्ही. पवार यांनी तर आभार शाखा अभियंता पी.एम. मानकर यांनी मानले.

Share