नागपूर विभागात डेंग्यूचे १२८ रुग्ण

0
6

नागपूर ,दि.22-डेंग्यूसदृश तापाने नागपूर जिल्हा फणफणला आहे. सहा जिल्ह्यांच्या नागपूर विभागात आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. यात महानगरपालिकेच्या हद्दीत ४६ तर नागपूर ग्रामीण भागात १६ असे एकूण ६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, १७ आॅगस्ट रोजी खात येथील १७ वर्षीय मुलीचा तर २० आॅगस्ट रोजी वाडी येथील ५७ वर्षीय इसमाचा डेंग्यू संशयित म्हणून मृत्यू झाल्याने डेंग्यूला घेऊन भीतीचे वातावरण आहे.नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सहा जिल्ह्यातील ९९२ डेंग्यू संशयित रुग्णांची रक्ताची तपासणी केली असता आतापर्यंत १२८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात नागपूर जिल्ह्यात ६२, वर्धेत ३१, चंद्रपुरात ३३, गडचिरोलीत दोन रुग्ण तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.