वर्ध्यात एकाची धारदार शस्त्राने हत्या, मृताची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची

0
4
वर्धा, दि. 25 : – वर्ध्यातील आनंदनगर येथील एका व्यक्तीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिलिंद सुभाष मेश्राम (४५ वर्षीय), असे मृतकाचे नाव आहे. मृताच्या शरीरावर ३० च्यावर जखमा आढळल्या आहेत.मिलिंद सुभाष मेश्राम आनंदनगर येथील रहिवासी असून तो मुलीसोबत येथे राहत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सध्या तो सर्व सामान्यपणे रेल्वे गाडीत चहा विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आज सकाळी जेव्हा मुलगी घरी पोहचली तेव्हा तो घरी आढळून आला नाही. शोध घेतला असता घराशेजारी अर्धवट बांधकाम केलेल्या घरच्या शौचालयातील टाक्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सुरुवातीला ओळख पटली नाही. पण जेव्हा ओळख पटली तेव्हा मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच सुद्धा पुढे आले आहे. कधीकाळी मिलिंद हा गांजा विक्रीचा व्यवसाय करत होता, असे पुढे येताच तपासाचे चक्र सर्व बाजूने फिरवत हत्या नेमकी कुठल्या करणातून झाली याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.