गोंदिया पालिकेच्या भूमिगत गटार योजनेला मंजूरी

0
9

सत्ताधारी भाजपच्या उपाध्यक्षासह १३ नगरसेवकांनी नोंदवला विरोध
गोंदिया,दि.27-गोंदिया नगरपरिषदेसाठी मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेच्या प्रस्तावाला घेऊन गेल्या अनेकवर्षापासून पालिकेच्या राजकारणात रणकंदन झाले.त्यातच दीडवर्षापुर्वी सत्तेवर आलेल्या पालिकेतील सत्ताधारी नेत्यांनीही या प्रस्तावाला टोलवाटोलवी करीत टाळण्याचे प्रयत्न केले होते.मात्र विरोधक सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी भूमिगत गटार योजनेकरीता विशेष सभेचे आयोजन करावे लागले.ती विशेष सभा आज सोमवारला नगरपालिका सभागृहात घेण्यात आली.त्या सभेत सत्ताधारी भाजपचे विद्यमान उपाध्यक्ष शिव शर्मा यांच्यासह १३ नगरसेवकांनी विरोध केल्याने २८ विरुध्द १३ मतांनी हा प्रस्ताव पारीत करण्यात आला.सत्ता पक्षाच्या नगरसेवकांनी सदर भूमिगत योजनेबद्दल सभागृहात सविस्तर माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करीत विरोधात मतदान केल्यानंतर सभात्याग केला.सभेत ४ विषय ठेवण्यात आले होते.त्यावर सत्तापक्षाच्या १८ पैकी १३ सदस्यांनी मतदानाची मागणी करीत भूमिगत गटार योजनेसंदर्भात सविस्तर माहिती सभागृहात ठेवण्याची मागणी केली.त्यावेळी सभागृहातील ४२ पैकी ४१ सदस्य हजर होते.त्यापैकी २८ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याने सदर प्रस्तावाला सभागृहाची मंजूरी मिळाली.याशिवाय कत्लखान्यासाठीच्या जमिनीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.तिसèया क्रमांकावर असलेल्या कृष्णपुरा वार्डातील उद्यानात भूमिगत योजनेच्या पंपिगस्टेशनला जागा उपलब्ध करुन देण्याच्याही प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.यावर सदस्य लोकेश यादव यांनी मात्र आपला विरोध नोंदवित बगीच्याच्या जागेएैवजी दुसरी जागा देण्यात यावी अशी मागणी केली.त्यासोबतच छोटा गोंदिया परिसरातील स्मशानघाट परिसरातील दोन एकर जागा गटार योजनेच्या पंपीग हाऊससाठी आरक्षित करण्यावर चर्चा करुन या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. ही भूमिगत गटार योजना दोन खंडात होणार असून यासाठी २६५ कोटी रुपयाचा निधी खर्च होणार आहे.पहिल्या खंडासाठी १२५ कोटी रुपये महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागामार्फत या कामासाठी निवडलेल्या लक्ष्मी कन्स्ट्रकश्न कंपनीला देण्यात आले आहे.ज्या कंपनीला हे काम देण्यात आले त्या कंपनीने आधी गोंदिया शहरातील पाणीपुरवठा योजनेचे काम केले असून निकृष्ठ दर्जाचे असल्याने त्या कंपनीच्या कामावर विश्वास नसल्याचे उपाध्यक्ष शिव शर्मा यांनी सांगितले.तसेच पक्षाच्या वरिष्ठांना या सर्व प्रकाराची माहिती देत वेळपडल्यास न्यायालयात सुध्दा जाण्याची तयारी असल्याचे सांगितले.