माथनी टोलनाक्यावर अवैध रेती नेणार्या 8 वाहनावर कारवाई

0
27

मौदा,दि.31(प्रा.शैलेश रोषनखेडे)-ः नागपूर ग्रामीण पोलीस  विभागातंर्गत येत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज शुक्रवारला सकाळी 7 वाजेच्या सुमारास माथनी टोलनाक्यावर विना राॅयल्टी रेतीची वाहतूक करणार्या 8 ट्रकवर कारवाई करीत 2 कोटी 41 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.नागपूर ग्रामीण विभागाचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी मोहीम चालविली आहे,त्यांअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.हे ट्रक भंडारा जिल्हातून रेती घेऊन नागपूरला दररोज जात असताना भंडारा महसूल विभाग व पोलीसांनी का कारवाई केली नाही अशा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.आज अवैधरित्या विना रायल्टी रेती वाहून नेणार्या ट्रकंना जप्त करण्याची मोहीम अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनिका राऊत,पोलिस निरिक्षक संजय पुरंदरे,पोलीस उपनिरिक्षक दुबे यांच्या चमूने केली.पकडेले ट्रक मौदा पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले असून आरोपींवर भादवी 379 कलम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील कार्रवाई निरीक्षक आशिफ शेख करत आहेत.