गुरुवारला दिव्यांगांना साहित्याचे वितरण,केंद्रीय राज्यमंत्री आठवले येणार

0
12
पालकमंत्री बडोले यांची पत्रपरिषदेत माहिती
गोंदिया,दि.05: सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय दिव्यांगत सशक्तीकरण विभाग, भारत सरकार व जिल्हा समाज कल्याण विभाग जि.प.गोंदियाच्यावतीने गुरुवार (दि.६) सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सडक अर्जुनी येथे तीन हजारहून अधिक दिव्यांग व्यक्तींना मोटराईज ट्रायसिकल, व्हिल चेअर, श्रवणयंत्र, टॉqकग मोबाईल, कॅलिपर, अंधकाठी, वॉकर, मतिमंद मुलांकरिता सिपी चेअर व एम.आर.किट तसेच अस्थिव्यंग व्यक्तीकरिता वेगवेगळी कृत्रिम अवयवांचे वितरण सकाळी ११ वा. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी पत्र परिषदेत माहिती देताना सांगितले की, मागील सहा महिन्यापुर्वी २० ते २३ फेबु्रवारी २०१८ दरम्यान जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक साधने व उपकरणे उपलब्ध करुन देण्याकरिता सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, गोंदिया व आमगाव येथे मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मोजमाप शिबिरात ३९८० दिव्यांग व्यक्तींचे परिक्षण भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अधिकारी आलिम्को, कानपूर द्वारा करण्यात आले. त्यापैकी ३००० दिव्यांग व्यक्ती सहाय्यक साधने व उपकरणे देण्यास पात्र ठरले. अशा पात्र ठरलेल्या दिव्यांग व्यक्तींना विविध उपकरणे वितरित करण्यात येणार आहे. याकरिता दिव्यांग व्यक्तीची वरील मोजमाप शिबिरात त्यांना मिळालेली पावती व आधार कार्ड घेवून कार्यक़्रम स्थळी १०.३० वाजेपर्यंत उपस्थित राहायचे आहे.
जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात राहणाèया दिव्यांग व्यक्तींना कार्यक्रम स्थळी येण्याकरिता तालुका स्तरावर एस.टी. महामंडळाच्या बसची सेवा आयोजकातर्फे नि:शुल्क स्वरुपात सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध राहणार आहे. कार्यक्रमात उपस्थित झालेल्या दिव्यांग व्यक्तींच्या मनोरंजनाकरिता दिव्यांग व्यक्तींचा स्वरगंध ऑकेस्ट्रा व आंतराष्ट्रीय ख्यातीच्या दिव्यांग जादुगर शितल किम्मतकर यांच्या मॅजीक शोचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या दिव्यांग व्यक्तीची एकदाही शारीरिक परीक्षण झाले नाही त्यांचे परिक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाची चमू कार्यक़्रम स्थळी उपस्थित राहणार आहे.
सडक अर्जुनी तालुका वगळून जे अस्थिव्यंग (दिव्यांग) व्यक्ती व्हिल चेअर व ट्रायसिकल मिळण्यासाठी पात्र आहे. अशा आमगाव येथे लक्ष्मणराव ामनकर बी.कॉम फार्मसी कॉलेज ८६ ट्रॉयसिकल व व्हिल चेअर ४६, अर्जुनी मोरगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्जुनी मोरगाव ११२ ट्रायसिकल व व्हिल चेअर ६४ व गोंदिया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन केवळ ३४२ ट्रायसिकल व्हिल चेअर १७५ चे वितरण करण्यात येणार आहे.
य वितरण समारंभाच्या आयोजनात भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, आलिम्को, कानपूर समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद गोंदिया, जिल्हा प्रशासन गोंदिया, महाराष्ट्र र ाज्य अपंग वित्त व विकास महामंडळ मुंबई, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र गोंदिया, अपंग कल्याणकारी संघटना, गोंदिया इत्यादी शासकीय व निमशासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळत असून कार्यक्रमाबाबत अधिक माहितीकरिता ९३२५६६९३६०, ९६८९६३१८५३, ७२६२८८४७३८, ७०५८१८५४०३,  ९९२११५०३७ या संपर्क क्रमांकावर  संपर्क साधण्याचे व कार्यक़्रमात सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री बडोले यांनी केले आहे. पत्र परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. कांबदरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अ‍ॅल्मीकोचे डॉ. गुप्ता, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार रमेश कुथे, विरेंद्र जायस्वाल, जि.प. समाज कल्याण अधिकारी रामटेके उपस्थित होते.
2 Attachments