सभापती अंबुलेच्या प्रयत्नाने अर्जुनी येथील दोन कुटुंबियांना आर्थिक मदत

0
9

गोंदिया,दि.05ः-तिरोडा तालुक्यातील अर्जुनी येथील भारत पतीराम बावनकर व रमेश काशिराम बरयेकर यांच्या घराला आग लागून झालेल्या नुकसानीबद्दल जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून प्रत्येकी 20 हजार रुपयाची आर्थिक मदत शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांच्या हस्ते नुकतीच देण्यात आली.11 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास भारत बावनकर व रमेश बरयेकर यांच्या राहत्या घराला अचानक लागल्याने घरातील सर्व साहित्य,वस्तु,अन्नधान्य जळून खाक झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले होते.त्यांना उदरनिर्वाहासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासोबतच जिल्हा परिषदेच्या निधीतूनही प्रत्येकी 20 हजार रुपये सभापती अंबुले यांनी मंजुर करुन दिले.त्या मंजुर निधीचा धनादेश त्यांना नुकतेच देण्यात आले.