बाबरवस्ती शाळेत ,धनगर समाज सेवा संघ मुंबईतर्फे वह्या, पेन व खाऊ वाटप

0
10

सांगली,दि.07ः-जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाबरवस्ती(पांडोझरी) जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत 4 सप्टेंबर रोजी धनगर समाज सेवा संघ मुंबईच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन व मिठाईचे वितरण आनंदराव हाक्के यांच्या हस्ते करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जपणे व समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो.माणूस कितीही मोठा झाला तरी ज्या मातीतून आपण गेलो, त्या मातीला आपण कधीच विसरणार नाही असे उद्गार आनंदराव हाक्के यांनी काढले.शाळेची गुणवत्ता व शाळेत राबवले जाणारे उपक्रम, वृक्ष संगोपन,बोलक्या भिंती पाहून ते भारावून गेले.दिलीप वाघमारे या शिक्षकांनी राबवलेल्या विविध उपक्रमाची दखल घेऊन या सेवा संघाचे पदाधिकारी गेल्या दोन वर्षांपासून शाळेला भेटी देतात व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. सविता मोटे,व सौ.. शोभा बाबर,सौ.कविता कोरे विशाल गोड,सत्यवान हाक्के,केरुबा गडदे,उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन व आभार दिलीप वाघमारे यांनी केले.