रिलायन्स पेट्रोलपंपवर दरोडा

0
6
मौदा,दि.10 : मौदा येथून १० किलोमीटरवर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील वडोदा येथील रिलायन्स पेट्रोलपंपावर शनिवार(दि ८) रात्री ९ वाजेच्या सुमारास चोरांनी दरोडा घालून १८,६५६ रुपये चोरून नेल्याची घटना घडली.शनिवारला रिलायन्स पेट्रोल पंपावर घटनेच्यावेळी आठ कर्मचारी कार्यरत होते. त्यापैकी हस्तराज मेश्राम हे पैसे जमा करण्याकरिता सेल्स रूममध्ये गेले असता अचानक दोन व्यक्ती तिथे शिरले.त्यामध्ये एकाच्या हातात तलवार व दुसऱ्याच्या हातात बंदूक(कट्टा) होती. तलवार व बंदुकीचा धाक दाखवून हस्तराज च्या निळ्या व हिरव्या रंगाच्या कॅश बॅग मधील ७,४९४रु, पॅन्टच्या खिशातून १०,००० रुपये सोबत कामावर असलेला रोशन अटारकरच्या जवळील १,१६२ रुपये असा एकूण १८,६५६ रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले.विशेष म्हणजे या दोघांचा एक साथी महामार्गावर वाहन घेऊन उभा होता.त्याचवेळी पोलीस आल्याची ओऱड होताच या चोरट्यांनी पलायन केले.मौदा पोलीसांनी कलम ३९४,४५२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनात  PSI किशोर धोपाडे करीत आहे.