तेलंगणामध्ये बसचा भीषण अपघात, 45 प्रवाशांचा मृत्यू

0
15

हैद्राबाद(वृत्तसंस्था)दि.11 – तेलंगणातील जगतियालमध्ये बसचा भीषण अपघात झाला असून अपघातात 45 लोकांचा मृत्यू  तर 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोंडागट्टू घाटात राज्य परिवहन निगमची बस उलटल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेल्या बसमध्ये एकूण 62 प्रवासी प्रवास करत होते. ब्रेक फेल झाल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. बस कोंडागट्टूच्या हनुमान मंदिर येथून जगतियालला जात असताना हा अपघात घडला.तेलगंणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.