जिल्ह्यातील विषय साधनव्यक्तीच्या बदल्या करा-रुचित वांढरे

0
18

गडचिरोली,दि.11ः- सर्व शिक्षा अभियान अंतर्गत गेल्या २००७ पासून जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर , गटसाधन केंद्रात विषय साधन व्यकींची पदे कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व साधनव्यक्ती हे आपल्या स्वगावापासून मागील ८ ते १० वर्षांपासून अतिदुर्गम , नक्षल ग्रस्त , डोंगराळ भागात सेवा करीत आहेत., मागासवर्गीय जिल्हा असल्या कारणाने बहुतांश गावी सोयी सुवेधेचा अभाव सुद्धा आहे अशा हलाखीच्या परिस्थितीत साधनव्यक्ती सेवा बजावित आहेत तसेच काही तालुक्यातील विषय साधनव्यक्ती आपल्या सेवेत लागल्या पासून आपल्या स्वगावी राहून (अंतर २०ते २५ कि.मी.)सुगम क्षेत्रात काम करीत आहेत.शासन परिपत्रकानुसार ३ ते ५ वर्षात बदली होतो आणि ते कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुधा लागू होतो पण या कडे दुर्लक्ष होत असल्याचे मत रुचित वांढरे यांनि व्यक्त केले आहे. साधन व्यक्तींनासुधा ३ ते ५ वर्षांनी विषय साधन व्यक्तींची तालुका बदली करून काही मोजक्याच कर्मचाऱ्यांवर जो अन्याय होत आहे , तो दूर करून सर्व सामान्य शिक्षका प्रमाणे प्रत्येकाला सुगम व दुर्गम क्षेत्रामध्ये सेवा करण्याची समान संधी उपलब्द करून देण्याची मागणी रुचित वांढरे यांनी केली आहे