‘त्या’वीर युवकाचा सत्कार

0
23

सिरोंचा,(अशोक दुर्गम) दि.15ः- गौरी विसर्जनासाठी आईसोबत प्राणहिता नदीघाटावर गेलेला १२ वर्षीय श्रेयस उईके हा खोल पाण्यात गेला. यावेळी नदीपात्रात डोंगा चालवित असलेला कार्तीक सुरजागडे याने पाण्यात उडी घेऊन बालकास वाविल्याने त्याचा शुक्रवारला  नगर पंचायतीच्य नगर सेविका राधिका नरेश तडकलवार यांनी डोंगा चालक कार्तीक सुरजागडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी सिरोंचाचे नायब तहसीलदार इंगड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष सतीश गंजीवार, नरेश तडकलवार, वसंत तोकलवार, मारोती गनपुरपूवार, ओमप्रकाश ताटिकोंडावार, बानय्या गग्गुरी, शंकर गग्गुरी, गरपटी, नागेश गग्गुरी, दिनेश येरोला, समीर दुग्यला, मलेश येररोला, सत्यम भट्टी, राजू पानेम, विठ्ठल येडलावार, चंटी, येडलावार, दिवाकर तनमनवार उपस्थित होते.
गुरुवारला सकाळी ११ वाजता ग्रामसेवक उईके यांच्या पत्नी प्राणहिता नदीघाटावर गौरी विसर्जनासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत १२ वर्षाचा मुलगा श्रेयस उईके हाही गेला होता. दरम्यान श्रेयस खोल पाण्यात गेला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने त्याला पाण्याचा अंदाज कळला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. अंतीम क्षणी डोंगा चालक कार्तीक सुरजागडे या युवकाच्या ही बाब लक्षात येताच, त्याने कुठलाही वेळ न घालवता पाण्यात उडी घेतली. अंतिम क्षणाला त्या मुलाला पाण्याबाहेर काढले. सोबत असलेल्या पोलीस जवान अजय मडावी यांच्या सहकार्याने मुलाला सुखरूप पाण्याबाहेर काढले. या कौतुकास्पद कार्यामुळे कार्तीक सुरजागाडे व पोलिस जवान अजय मडावी या दोन वीर युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.