राष्ट्रीय महामार्गावरील बाम्हणी फाट्यावर बिबट्याचा मृत्यू

0
10

सडक अर्जुनी,दि.15ः- मुंबई-कोलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील डोंगरगाव डेपोजवळील बाम्हणी फाट्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणार्या एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ८ च्या सुमारास घडली.नागझिरा-नवेगावबांध अभयारण्य परिसरातून हा राष्ट्रीय महामार्ग जात असून वन्यप्राण्यांच्या या मार्गावरुन आवागमन असल्यानेच 10 किमीच्या भागात अद्यापही रस्ते बांधकाम करण्यात आलेले नाही.वन्यप्रेमी सातत्याने या मार्गावर नैसर्गिक अंडरपास तयार करण्याची मागणी करीत असून वनविभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मुक्या प्राण्यांना जिव गमावण्याची वेळ आली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे परिविक्षाधिन वनअधिकारी नवकिशोर रेड्डी, सडक अर्जुनी वनपरिक्षेत्राचे वनअधिकारी राठोड घटनास्थळी पोहोचून मृत बिबट्याचा घटनास्थळीचा पंचनामा केला. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. घोडस्कर आणि वाघाडे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर डोंगरगाव डेपो परिसरातील जंगलात अंत्यसंस्कार करण्यात आले.