सिमावर्ती प्रश्नांसबंधी जिल्हाधिका-यांनी घेतली सर्व विभागाची आढावा बैठक

0
11
बिलोली (सय्यद रियाज) दि.१५.;-महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्याच्या सिमेवर असलेल्या बिलोली  तालुक्यातील सिमावर्ती भागातील नागरिकांच्या विविध अडचणी संदर्भात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दि.१५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिमावर्ती प्रश्नां संबंधित कामाचा आढावा घेतला.
    गत काही महिन्यापासून बिलोली तालुक्यातील सिमावर्ती भागातील गावांच्या न झालेल्या विकासा संदर्भात विविध गावचे सरपंच,पञकार,व ग्रामस्थांनी मिळून सातत्याने बैठकांचे आयोजन करून सिमावर्ती भागात असलेल्या ज्वलंत प्रश्नांबाबत शासन,प्रशासन,लोकप्रतिनीधी यांचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने चळवळ सुरू ठेवली आहे.याबाबत जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते.त्यावेळी जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार तहसिलदार बिलोली यांच्या अध्यक्षतेखाली बिलोली येथे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक सिमावर्ती भागातील विकास कामांचा आढावा घेण्यात आला होता.तहसिलदारांच्या बैठकीनंतर जिल्हाधिका-यांनी दिलेल्या अश्वासनानुसार शनिवार५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी जिल्हा परिषद,जिल्हा कृषी अधिकारी,विद्युत वितरण कंपनी,उप वनसंरक्षक ,जिल्हा मार्केटींग अधिकारी,पाठबंदारे विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,उप विभागीय अधिकारी बिलोली,महसुल तहसिलदार नांदेड व तहसिल कार्यालय बिलोली या विभागाच्या अधिकाऱ्या समवेत बैठक घेऊन सिमावर्ती भागातील विविध कामांचा आढावा घेतला.सदर बैठकीत दौलतापुर येथील पुणर्वसण,बिलोली शहरातील हनुमान मंदिरा समोरील व्यापारी संकुल सुरू करणे आदी विषयावर सविस्तर चर्चा होऊन या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.यावेळी सीमावर्ती भागाचे प्रमुख  समन्वयक गोविंद मुंडकर हे उपस्थित होते.