पोलिसांच्या आशिर्वादाने २५ दारू बंदी गावात पुन्हा दारू विक्री सुरू

0
76
सालई खुर्द( नितीन लिल्हारे),दि.16  : जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेले मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हे आहे, आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ४५ गावाचा समावेश असून यात २५ गावात यापूर्वी असलेल्या ठानेदारानी दारू बंदी केली होती. बैठक झाली की अवैध धंदे सुरू होतो तो पर्यत सुरू होत नाही, हे विशेष आहे. ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ४५ गावा मधून आंबागड बिट सर्वात जास्त पोलिसांना कमाई करून देणारे उत्पनाचे साधन बनले आहे. कायदा व सुव्यवस्था आबादीत ठेवणार असल्याचे ठानेदारांनी बोलले होते मात्र हे सर्व फोल ठरले असून दारू बंदी गावात दारू विक्री पोलीसांच्या आशीर्वादाने सुरू झाली आहे.
पुरातन काळातील पर्वत रांगेत वसलेल्या आंबागड  येथे अनेक वर्षांपासून अवैध धंदे सुरू आहे. या परिसरात अवैध जनावरांची वाहतूक, रेती वाहतूक, दारू,जुगार असे अनेक अवैध धंदे जोमात सुरू आहे. श्री क्षेत्र गायमुख देवस्थान असलेल्या पवित्र स्थान येथे एकेकाळी दारू बंदी होती पोलिसांच्या आशीर्वादाने पुन्हा दारूचा महापुर सुरु झाला असून यापूर्वी गायमुख येथे एक शेतमजूराला दारू मूळे आपले जीव गमवा लागले होते. आंधळगाव येथील महिलानी दारूबंदी करण्यासाठी अनेक वेळा मोर्चा करावा लागला परंतु त्यांना यश मिळाले नाही, स्थायी पोलीस स्टेशन असून सुद्दा दारू बंदी होत का नाही अशा प्रसन्न आंधळगाव वाशियांना पडला आहे. आंबागड, लहान गायमुख, रामपूर, बपेरा, वळेगाव, अशा जवळपास २५ गावात दारू बंधी होती आता पुन्हा पोलिसांच्या आशीर्वादाने दारू विक्री सुरू झाली आहे. पुरातन काळातील आंबागड किल्ला जवळ गावाच्या शेत शिवारात राजरोस पणे अवैद्य जनावरांचा ताबा दिसून येतो, दर बुधवार येथे बैल बाजार भरतो परंतु या बाजारात एकही शेतकरी, शेतमजूर दिसणार नाही सर्व कामठी,मध्यप्रदेश, हैदराबाद अशा परदेशातून व्यापारी येतात. या बैल बाजारात मध्ये प्रदेशाहून गायी व बैल हे जनावरे येतात व मोठ्या संख्येने आंबागड बैल बाजारात विक्री होते. विक्री झाल्यानंतर हे जनावरे आंबागड वरून रामपूर, गायमुख, जांब, कान्द्री या मार्गाने कामठी येथे कत्तल खाण्यात जातो. अशी गोपनीय माहिती आहे. अवैद्य बैलाची कोंडी वाहतूक राजरोस पणे सुरु आहे. हे सर्व प्रकार आंधळगाव पोलीसांना माहीत असून बघ्यांची भूमिका बजावत आहे. अवैध धंदे करणारे पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून पोलीस विभागाला जाग येईना. आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा अवैद्य बैलाची वाहतूक, रेती वाहतूक, दारू, मटका, जुगार, कोंबडा बाजार व गुटखा विक्री अशा धंद्याला आळा बसतो पोलिसांची बैठक झाली की पुन्हा अवैध धंदे सुरु होतो हे आंधळगाव पोलीस ठाण्याचे विशेष आहे. म्हणून गावखेड्यापासून तर दिल्लीपर्यत अवैद्य धंद्याला उत आला आहे. राजरोसपणे अवैद्य धंदे जोरात सुरू असून, बोकाळलेला अवैध धंद्याला लगाम कोण घालणार?
पोलिस यंत्रणाच अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याने तालुक्‍यातील अवैध धंदेवाल्यांना एकप्रकारचे प्रोत्साहनच मिळत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. अवैद्य धंदे स्थानिक राजकीय नावाचा वापर करून भररस्त्याने करीत असून यामुळे भारताचे तरूण युवा व्यसनाच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊ लागला आहे.
पोलीस विभाग अवैध घंदे मिटविण्यासाठी पुढाकार  घेण्याचे अपेक्षित नसून अवैध धंदेनासुद्धा उत आला आहे असे दिसून येत आहे. अशा व्यसनांच्या आहारी गेल्याने ग्रामस्थांत भांडणे निर्माण होत आहेत, याची मजल पोलिस ठाण्यात तक्रार देण्यापर्यंत जाते. यावरून गावागावांत फिर्यादी व गुन्हेगारांच्या दोन गटांत मारामारी होते. यातून एका तंट्यामुळे परत दुसऱ्या तंट्याची सुरवात होते. हा तंटा वर्षानुवर्षे न्यायालयात निकाल लागेपर्यंत सुरू असतो. यात वेळ, पैसा, श्रम व प्रतिष्ठा पणाला लागत असून; बदनामीलासुद्धा सामोरे जावे लागते.
वरिष्ठ पोलिस अधिकारी लक्ष देत नसल्याचे सर्व प्रकार घडत असल्याचे बोलले जात आहे.पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखवून अवैध धंद्यांविरुद्ध बंड पुकारावे व आपल्या कामाचा दाखला द्यावा.अवैध धंद्याला व वाहतुकीला पोलिसांनी हीरवा कंदील दिला जात असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.