मुख्य बातम्या:

काँग्रेस नेते पटोलेंच्या नेतृत्वात धडकला जनआक्रोश मोर्चा

भंडारा दि. १८ :–:भंडारा गोदीया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार नाना पटोलें यांनी राष्ट्रीय काँग्रेस किसान खेत मजदुरच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सुत्रे सोमवारी दिल्लीत स्विकारल्यानंतर आज मंगळवारला आपल्या मतदार संघातील भंडारा येथे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढून शासनाच्या सर्व सामान्य, शेतकरी, शेतमजूर विरोधी सरकारचा निषेध नोंदविला. येथील दसरा मैदानातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येत पोहोचला. या मोच्र्याचे नेतृत्व माजी खासदार नाना पटोले यांनी केले. या मोर्च्यातया मोर्चात माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, शहर कमेटीचे अध्यक्ष सचिन घनमारे, प्रफुल्ल गुडधे, डॉ.विनोद भोयर, मुजीब पठाण, जिया पटेल, प्रमिला कुटे, प्रमोद तितीरमारे,डाॅ.पंकज कारेमोरे, मधुकर लिचडे, प्रकाश पचारे, प्रेम वनवे, रेखा वासनिक, बंडू ढेंगरे, खुशाल गिदमारे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.  या मोर्चात बैलगाडी, गॅस सिलिंडरचे कटआऊट, डोक्यावर सरपणाची मोळी घेतलेल्या महिला सहभागी झाल्या होत्या
राफेल लढाऊ विमान घोटाळा व भ्रष्टाचाराची वाचा फोडण्याकरिता, गॅस, पेट्रोल, डिझेल ची भस्मासुरी दरवाढ थांबविण्याकरिता इंधन भार कमी करण्यास शासनाला भाग पाडण्याकरिता, शेतकèयांचे सरसकट कर्जमाफी करिता, शेतकèयांचे विजेचे बिल माफ करण्याकरिता, शेतकèयांना २४ तास विज मिळण्याकरिता, शेतकèयांचे उत्पन्न वाढविण्याकरिता दुधाचे भाव वाढवून देण्याकरिता, २०१४ ते २०१८ पर्यंतचे सर्व पिक विम्याचे पैसे मिळविण्याकरिता, युवक बेरोजगारी-युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता, एपीएल राशन कार्ड धारकांना धान मिळवून देण्याकरिता, एस.सी., एस.टी, ओबीसी विद्याथ्र्यांना स्कॉलरशिप मिळवून देण्याकरिता, महिलांवरील अत्याचाराला आळा बसविण्याकरिता तसेच अन्यायाला वाचा फोडण्याकरिता शेतकरी-शेतमजूर-त्रस्त सामान्य जनतेच्या या मागण्यांचा घेऊन या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोच्र्यामुळे शहरातील व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Share