अनु.जातीच्या विद्यार्थ्यांनी परदेश शिक्षणाचा लाभ घ्यावा  – सहा.आयुक्त भगवान वीर

0
15
नांदेड-  सामाजिक न्याय भवन नाांदेड च्या कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण  सांस्था बार्टी पुणे च्या वतीने १७ सप्टेंबर  रोजी  आयोजित कार्यशाळेत परदेश शिक्षणाच्या संधी हा कार्यक्रम संपन्न झाला समाजकल्याण विभागाच्या वतीने अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास वेळोवेळी तत्पर राहील परदेशात शिक्षण घेण्याच्या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  लाभ घ्यावा असे आव्हान समाजकल्याण सहा.आयुक्त भगवान वीर याांनी केले आहे राज्य शासनाच्या व केंद्र  शासनाच्या शिष्यवृत्ती आहेत याचा लाभ घेण्यासाी अनुजातीमधील सर्व  विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ.सुरज एंगडे यांनी सांगितले  की संशोधन आधारित शिक्षण  पद्धती रुजायला हवी या विषयावर जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्यात आले भारतीय शिक्षण पद्धती पूर्वापार चालत आली आहे याच काळानुरूप बदल होणे अपेक्षित  असताना तसे झाले नाही त्यातून संशोधनाला फारसा वाव मिळाला नाही त्यामुळे जगातील काही राष्ट्राप्रमाणे संशोधनावर आधारित  शिक्षण पद्धतीचा स्वीकार करायला हवा तरच नवे शोध व नव्या कल्पनाांचा जन्म होईल तसेच परदेशात शिक्षण  घेण्यासाठी  सर्व  वीद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करण्यात आले .विद्यार्थ्यांनी  इंग्रजी  शिक्षणाची भीती बाळगू नये व परदेशात जाण्यासाठी  ज्या परीक्षा आहेत त्याविषयी सर्व  माहिती  देण्यात आली तसेच डॉक्टर , इांजिनियर हेच नाही तर शिक्षणासाठी सर्व  दरवाजे  उघडे आहेत त्यासाठी  विद्यार्थ्यांनी  सर्व  प्रकारच्या शिक्षणाचा लाभ घ्यावा .असे प्रतिपादन अमेरिका  येथील हॉवर्ड विद्यापीठातील सांशोधक प्राध्यापक डॉ.सुरज एंगडे याांनी केले यावेळी सहाय्यक प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे मार्गदर्शन  करताना सांगितले की, ,विविध योजनेचा  प्रचार व प्रसार समतादतूत मार्फत करत आहोत परदेशी शिक्षणासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी कसे पाठवता येईल याचा प्रचार व प्रसार समतादुतांमार्फत करण्यात येईल असे आश्वासन जिल्हा प्रकल्प अधिकारी तथा सहा.प्रकल्प संचालिका सौ.सुजाता पोहरे यांनी दिले आहे  सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील समतादुत सचिन घुले ,खंडु फोले,नागनाथ कोलमारे,विनोद पाचंगे,इर्शाद मौलाना,ज्योती जाधव ,ज्योती जोंधळे ,बालाजी डुमणे, दिगंबर पोतूलवार , शारदा माले,दिपाली हाडोळे,प्रीती जमदाडे, जगदीश निवळे, महेश इंगोले, दिलीप सोंडारे, राणी बंडेवार अविनाश जोंधळे, जयश्री गायकवाड यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रम चे सूत्रसंचालन समतादुत अविनाश जोंधळे तर आभार ज्योती जाधव याांनी मानले.