बालाजी पडलवार लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
16

सांगली(दिलीप वाघमारे),दि.26ः-मोटेवाडी जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक बालाजी पडलवार यांना त्यांच्या कार्याबदद्ल  सहकार मंत्री तथा पालकमंत्री सुभाषबापू देशमुख यांच्या हस्ते लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार 2018 ने सन्मानित करण्यात आलेले आहे.यावेळी आमदार विलासराव जगताप,शेखर चरेगावकर, डॉ .रवींद्र आरळी तम्मणगौडा रवीपाटील ,सरदार पाटील,प्रभाकर जाधव,गोपाल बजाज,दिनकर पतंगे,दिलीप वाघमारे,शाम राठोड,लखन होनमोरे,रुपेश गोपोड,बागल आदी मान्यवर उपस्थित होते.लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

प्राथमिक शाळेचे उच्च प्राथमिक शाळेत रूपांतर शैक्षणिक व सामाजिक कार्य स्वच्छ भारत अभियान ,शाळेसाठी संरक्षण भिंत, पाणी वाटर फिल्टर ,श्रमदान, वृक्षरोपण यात सहभाग घेऊन विद्यार्थी पालक मेळावा माता पालक मेळाव्याचे आयोजन, विद्यार्थी संख्या वाढीसाठी प्रयत्न,शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शैक्षणिक उठाव, ग्रामस्थांकडून भरघोस मदत. ग्रामपंचायतीकडून 75 खड्डे काढून लोकसहभाग व लोकसहभागातून 100 वृक्षांची लागवड ,स्वच्छता अभियान, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग , रक्तदान शिबिर सहभाग, जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधनात्मक दर्जा, विद्यार्थ्यांचे वाचन स्पष्ट होण्यासाठी प्रकट वाचन नवोपक्रम सहशालेय उपक्रम राबवून शालेय दर्जा , हस्ताक्षर सुधार , मुलांमध्ये संगणक शिक्षण ,शालेय दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न केले.