केरळ आपत्तीग्रस्तांसाठी शिर्डी श्री साईबाबा विश्वस्तांकडून 05 कोटींची मुख्यमंत्र्यांमार्फत मदत

0
11
????????????????????????????????????

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.28ः – शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 05 कोटींचा धनादेश केरळ येथे झालेल्या आपत्तीग्रस्तांना संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपुर्द केला.
केरळ राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पुर परिस्थिती निर्माण झालेली होती. यामुळे केरळमधील जनजीवन विस्‍कळीत झाले होवून परिस्थिती अतिशय बिकट बनलेली आहे. या पुरामुळे लाखो नागरिक बेघर झाले असून अनेक गांवेही उध्‍वस्‍त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्‍ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजुन व माणुसकीच्‍या संवेदनांना साद देऊन केरळमधील या आपत्‍तीग्रस्‍तांसाठी 05 कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय संस्‍थानच्‍या व्‍यवस्‍थापन समितीने घेतलेला होता. त्‍यानुसार केरळमधील पुरामुळे आपद्ग्रस्‍त झालेल्‍या पुरग्रस्‍तांसाठी संस्‍थानच्‍या वतीने 05 कोटी रुपयांचा धनादेश राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडे संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे व राज्‍याचे जलसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सुपूर्त केला.
यावेळी जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, सामान्य प्रशासन राज्य मंत्री मदन येरावार, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.