राष्ट्रवादीचे शासनाच्या विरोधी धोरणांना घेऊन आंदोलन

0
17

आमगाव(महेश मेश्राम)दि.29ः-केंद्र व राज्य सरकारच्या अफलातून कारभाराने सर्वसामान्य मेटाकुटीस आला आहे. असे असताना वाढती महागाई, इंधनदरवाढ, विजदरात झालेली वाढ, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ व शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांना घेवून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर  (दि.२८) आंदोलन करण्यात आले. दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करून इंधनदरवाढ व महागाई कमी करून शेतकर्‍यांना शेतपीक नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
केंद्र व राज्य सरकार मोठमोठय़ा आश्‍वासन देवून सत्तेत आली. मात्र मागील चार वर्षांपासून या सरकारने विविध धोरण व नितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, लघु व्यावसायिकांना मेटाकुटीस आणण्याचा प्रयत्न केला. तर ‘अच्छे दिन’च्या नावावर इंधनदरवाढ, गॅस सिलिंडरच्या वाढते दर, विजदरात वाढ, शेतकर्‍यांना मावा, तुडतुड्याशे अनुदान न देणे, कर्जमाफीत भेदभावपूर्ण व्यवहार करून लाभार्थ्यांना डावलणे, अनेक गरजू लाभार्थ्यांना घरकूल योजनेपासून वंचित ठेवणे आदींच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक व शेतकर्‍यांना त्रास देण्याचा प्रकार चालविला आहे.
आंदोलनात माजी म्हाडा सभापती नरेशभाऊ माहेश्‍वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजयभाऊ शिवनकर, माजी आमदार दिलीप बन्सोड, विरोधी पक्ष नेते गंगाधर परशुरामकर, प्रभाकर दोनोडे, किशोर तरोणे, रमेश ताराम, राजेश भक्तवर्ती, सुरेश हर्ष, जियालाल पंधरे, सुकराम फुंडे, कमलबापू बहेकार, प्रमोद शिवणकर, रवी क्षिरसागर, तीरथ येटरे, अजय बिसेन, टिकाराम मेंढे, श्रीमती ऊषाताई हर्षे, श्रीमती कविता ताई रहांगडाले, अंजुताई बिसेन, संगीताताई दोनोडे, हरविलाताई मडावी, सिंधुताई भुते, जयश्रीताई पुंडकर, पाचे ताई, सिमाताई शेंडे, नरेंद्र शिवणकर, तुलेन्द कटरे, संतोष श्रीखंडे, आनंद शर्मा, प्रफुल्ल ठाकरे, योगेश चौधरी, गणेश पाथोडे, अमीत प्रधान, सुमीत भिमटे, रोहीत कुर्वे, कमलेश बहेकार यांच्या राकाँचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.