नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात भोपळा

0
30

● कर्जमाफी योजनेतील २५ टक्के अनुदान व तूळ तुळयाची भरपाई द्या
●तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याना निवेदन

नितीन लिल्हारे
मोहाडी,दि.29: शासनाच्या निर्धारित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात आली होती. परंतु सरकारने कर्जमाफी साठी जाहीर केलेले निकष पाहता ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याच्या भरोशावर बँकिंग व्यवस्था टिकून असतांना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली नाही. तालुक्यात ४ हजार ८४५ शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत सदर शेतकऱ्यांना योजनेतील २५ टक्के अनुदान मिळाला नाही व तूळतुळा नुकसान भरपाई पैसे सुद्दा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले नाही या करीता मोहाडी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

मोहाडी तालुक्यात आतापर्यंत कर्जमाफी अनुदान ४ हजार सहाशे पंधरा शेतकऱ्यांना ७,१२,८१,७०९ रुपये व थकबाकीदार २ हजार ३५९ शेतकऱ्यांना १०४,४५,२९,२०६ रुपये व ओटीएस ७३ शेतकऱ्यांना १,१०,४४,५९४ रुपये यांना लाभ मिळाला. कर्ज माफी अनुदान योजनेपासून वंचित असलेल्या १ हजार ८६६ शेतकरी व ३,७६,४६,२८३ रुपये व थकबाकीदार
शेतकरी २ हजार ८०१ व १२,३५,४७,४०९ रुपये व ओटीएस १७१ शेतकरी व ४,३२,०६,९११ रुपये असे एकूण ४ हजार ८४५ शेतकरी व १०४४००६०२ रुपये शिल्लक आहेत.
वर्षपूर्ण होऊनही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. तुळतुळा नुकसान भरपाई पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले नाही. नुकसान भरपाई नाव देऊन श्रेय लादण्याचा प्रकार शासन राबवित आहे. तोंड पाहून शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले आहे यात सुद्दा मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे.
शेतकरी परिश्रम करून अन्न धान्य पिकवतात तो पर्यत शेतकऱ्यांकडे रिमोट कंट्रोल असतो धान्य विकायला काढला की रिमोट कंट्रोल व्यापारी व सरकार कडे राहतो हे कृषी प्रधान देशाचे दुर्भाग्य आहे. शेतकरी व्याजात सवलत मिळाली म्हणून मार्च महिन्याच्या अखेरीस उसनवारी करून किंवा सावकार कडून पैसे उचलून पीक कर्जाची तात्पुरती परतफेड करतात, की आपले पैसे काही दिवसातच आपल्या मिळतील अशा आशेत शेतकरी राहतो, परंतु ही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही कर्जमाफी नसून कर्ज वसुली आहे अशा प्रश्नन नियमित कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना पडला आहे, कर्ज भरलेल्या शेतकऱ्याच्या विचारले तर तोंडातून एकच शब्द निघतो की आता मी कर्ज भरणार नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी ज्याने करून कोणत्याही शेतकऱ्यां बरोबर दुजाभाव होणार नाही. शेतकरी वर्गानी शासन व प्रशासन यांच्या विरुद्ध संताप व्यक्त केला आहे. तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २५ टक्के अनुदान रक्कम व तूळतुळ्याचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात यावे असे निवेदन सामाजिक कार्यकर्ता नितीन लिल्हारे, राजू तुमसर सामाजिक कार्यकर्ता, सरपंच सोमेश्वर ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता कमलेश आखरे, सरपंच प्रभाकर मोहतुरे, माजी उपसरपंच यशवंत गायधने, सरपंच मदन मोहतुरे, रवि पटले, राजेश हटवार, प्रवीण लिल्हारे, ईश्वर लिल्हारे, गणेश नेवारे, प्रल्हाद निमकर यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याना देण्यात आले आहे.