गरीबी व आजाराला कंटाळून आत्महत्या

0
19

नवेगावबांध(सतिश कोसरकर),दि.०३ः-अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गंत येत असलेल्या रांजीटोला-कोहलगाव येथील ४७ वर्षीय क्षयरुग्ण इसमाने गरीबी व आजाराला कटांळून पत्नी शेतात गेली असता गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारला दुपारच्यावेळी उघडकीस आली.सदर इसमाचे नाव बैजुराम किसनजी मेश्राम असे आहे.त्याच्या मागे पत्नी,मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे.माहिती मिळताच नवेगांवबांध पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक स्वप्निल उजवणे यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा सुरु केला आहे.