बेरार टाईम्सचा दणका जीएडी डेप्युटीसीईओंनी बदलला कार्यभार आदेश

0
5

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.०५ः-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी ३ ऑक्टोंबर २०१८ रोजी काढलेल्या पत्रात कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदाचा पदभार परिचराकडे सोपविल्याचे वृत्त बेरार टाईम्स न्युजपोर्टलने जीएडी डेप्युटी सीईओचा प्रताप,परिचराला दिला कनिष्ठ सहाय्यकाचा पदभार या मथळ्याखाली 4 आक्टोंबरला वृत्त प्रकाशित करताच सामान्य प्रशासन विभाग खळबळून जागे झाले.आणि झालेली चूक दुरुस्त करीत 4 आ्क्टोंबरला दुपारनंतर सुधारीत आदेश काढत परिचराकडे सोपविलेल्या पदभार सामान्य प्रशासन विभागातीलच कर्मचारी घुगे याच्याकडे कनिष्ठ सहाय्यक(लेखा)पऴसकर यांचा पदभार सोपविल्याची माहिती सुत्रांनी दिली.बेरार टाईम्सने बातमी प्रकाशीत करताच उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाळके यांच्या कार्यप्रणालीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून असे अनेक प्रकरणे सखोल चौकशीअंती समोर येणार आहेत.

सविस्तर असे की सामान्य प्रशासन विभागातील कार्यरत कनिष्ठ सहाय्यक(लेखा)यु.एच.पळसकर यांची प्रशासकीय बदली आमगाव पंचायत समिती येथे झाली.त्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी ३ ऑक्टोंबर २०१८ रोजी पळसकरला दुपारनंतर कार्यमुक्त करण्यात आले.कार्यमुक्त करतांना त्याच्याकडे असलेला पदभार हा समकक्ष कर्मचाèयाकडे सोपविण्यात येतो.मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाळके यांनी त्याला फाटा देत सामान्य प्रशासन विभागातील परिचराकडे कार्यासन क्रमांक ११ व १५ चा संपूर्ण कार्यभार पुढील आदेशापर्यंत देण्यात येत असल्याचे आदेशच जारी केले होते.