पांगडी व लेंडेझरी जगंलपरिसरातून गंगाझरी पोलिसांनी केला ८२ हजाराचा मुद्देमाल जप्त

0
16

गोंदिया,दि.०५ः- जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन आणि नियंत्रणाच्या दृष्टीने पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांच्या निर्देशानुसार गंगाझरी पोलीसांनी अवैधधंदे,दारु,सट्टा मटका व्यवसायाकाविरुध्द जोरदार मोहीम उघडली असून ५ सप्टेंबरला पांगडी जंगल परिसरातून सुमारे ३०० किलो सडका मोहफुल जप्त करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे.त्याचप्रमाणे लेंडेझरी (हटी) जंगल शिवारातूनही ४५० किलो सडका मोहफुलासह ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गंत येत असलेŸल्या पागंडी येथील जंगलात सुरु असलेल्या दशरथ फेकलू पुराम यांच्याताब्यातील १० गोळे सडवा मोहफुल अंदाजे ३०० किलो असा ३९१०० रुपयाचा माल जप्त केला.तर लेंडेझरी(हेटी) येथील हेतराम सुरजलाल सलाम हा सुध्दा जंगलपरिसरात अवैध हातभट्टी दारू काढत असतांना मुद्देमालासह जप्त करण्यात आले.यामध्ये २ हजार रुपये किमतीचे १ जर्मन करची,३ हजार किमतिचे २ नग मोठी करची,१ नग पाईप,१ लाकडी टवरा स्टिल नळीसह,नेवार पट्टी,प्लास्टिक चाळी,रबरी ट्युब मध्ये असलेली १५० लीटर हातभट्टीची दारू व १५ प्लास्टिक बोरीमध्ये असलेला ४५० किलो सडवा मोहफुल असा ४२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक शितल जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.यावेळी पोलीस उनिरिक्षक अमोल सोनवाने,स.फौ.लिल्हारे,पोलीस नायक चोपकर,बघेले,शिपाई धांडे,बघेल आदी कर्मचारी हजर होते.