सोनी सब टीव्हीच्या ‘मस्त कलंदर’ शोमध्ये गोंदियाच्या सृष्टी बहेकारची भरारी

0
11

गोंदिया,दि.06ः-मागील तीन महिन्यांपासून सोनी सब टीव्हीवर ‘मस्त कलंदर’ हा डान्स रियालिटी शो सुरू आहे. यामध्ये सृष्टी विजय बहेकारने जोडीदारासह सहभाग घेतला. एक-एक पायरी ओलांडत प्रेक्षक व परीक्षकांची मने जिंकून तिने उपांत्य फेरीपयर्ंतचा प्रवास पूर्ण केला आहे. येत्या शनिवार व रविवार या दोन दिवशी प्रदर्शित होणार्‍या शोमध्ये तिचा उपांत्य फेरीतील ‘बबल्स डान्स’ प्रेक्षकांना पहावयास मिळणार आहे. विशेष म्हणजे, गोंदियासारख्या छोट्याश्या शहरातून राष्ट्रीय पातळीच्या रियालिटी शोमध्ये मजल मारणार्‍या सृष्टी विजय बहेकारचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बहेकार व कल्पना बहेकार यांची मुलगी सृष्टी ही मुंबई येथील पोड फाऊंडेशन येरला मेडिकल ट्रस्ट या वैद्यकीय महाविद्यालयातील दंत चिकित्सा अभ्यासक्रमात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. सृष्टीचे जन्म गोंदिया येथे झाले आहे. तिने १0 वीपयर्ंतचे शिक्षण गोंदियात घेतले. यानंतर १२वीपयर्ंतचे शिक्षण नागपूर येथे घेतले. यानंतर ती दंत चिकित्सा पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेली. सृष्टीला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. शालेय शिक्षणातही होणार्‍या कार्यक्रमात सृष्टी नृत्य स्पर्धांमध्ये सहभाग घेत असे. मुंबईला शिक्षण घेताना तिने नृत्य शिकवणी वर्गात प्रवेश घेतला. त्यातच सोनी सब या वाहिनीच्या माध्यमातून सुरू होणार्‍या ‘मस्त कलंदर’मध्ये नृत्य गुरु रोबो उर्फ विक्रमसिंह वोरा यांच्यासह जोडीने तिने सहभाग घेतला. पात्रता फेरीत सृष्टीची निवड झाली. सातत्याने तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या स्पर्धात्मक रियालिटी शोमध्ये ‘बबल्स डान्स’च्या माध्यमातून परीक्षक प्रसिद्ध गायक मीका सिंग व डान्स कोरियोग्राफर गीता कपूर यांची मने जिंकली. एक-एक पायरी चढत सृष्टी व रोबो या दोघांच्या जोडीने उपांत्य फेरी गाठली आहे. हा शो दर शनिवार व रविवारला रात्री ९ वाजता प्रदर्शित होत आहे. सृष्टीने रियालिटी शोमध्ये गोंदिया व विदभार्चे नाव लौकिक केले आहे. यासंदर्भात सृष्टीचे वडील विजय बहेकार व कल्पना बहेकार यांनी माहिती दिली.