महागाई विरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

0
7
तिरोडा दि.0 ६ : : तिरोडा तालुका राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे एक दिवसीय धरणे आंदोलन ४ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. या धरणे आंदोलनाप्रसंगी माजी आ. दिलीप बन्सोड, डॉ. अविनाश जायस्वाल, अजय गौर, नरेश कुंभारे, पं.स. सभापती नीता रहांगडाले, उपसभापती मनोहर राऊत, डॉ. किशोर पारधी, पं.स. सदस्य संध्या गजभिये, प्रदीप मेश्राम, नत्थू अंबुले यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन देऊन उपविभागीय अधिकारी गंगाराम तळपाडे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. .

दिलेल्या निवेदनात केंद्र सरकारने मागील एक वर्षात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाल्याने आपल्या कुटुंबाचे पालन करण्यासाठी असमर्थ होत असल्याने भाववाढ कमी करावी, महाराष्ट्र शासनाने घरगुती विद्युत कनेक्शन व कृषी पंप कनेक्शन, लघू उद्योग, विद्युत कनेक्शन दरात केलेली वाढ तसेच रासायनिक कनेक्शन दरात केलेली वाढ तसेच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती कमी करून शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवाव्या, मावा तुडतुडा, कीडरोग वाटपाचे आलेले १२ कोटी पैकी केवळ ४ कोटी अनुदान वाटप करण्यात आले असून उरलेले ८ कोटींचे वितरण त्वरित करा, शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमुक्तीची रक्कम अजूनही मिळाली नसून त्वरित रक्कम खात्यात जमा करण्यात यावी, तालुक्यात एकच हमीभाव धान खरेदी केंद्र असल्याने प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करावे, मजुरांचे पलायन थांबावे म्हणून प्रत्येक परिवाराच्या सदस्यास ९० दिवस रोजगार हमी योजनेचे काम द्यावे, रोजगार हमी योजनेचे थांबलेले वेतन त्वरित द्यावे, तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाची शेती होत असल्याने नियोजन करून रोजगार हमी योजनेंतर्गत धान रोवणीचे मजुरांना काम द्यावे व वाढती महागाई थांबवून पेट्रोल, डिझेल, गॅस, औषधाच्या किमती त्वरित कमी कराव्या असे निवेदन देण्यात आले. .