केदार साळुंकेना रेती माफीयाकडून जीवे मारण्याचा कट असल्याचे पत्र 

0
12
 नांदेड,दि.08:-बिलोली तालुक्यातील अवैध रेती उत्खनन प्रकरणी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कार्यवाही होत नसल्याने रीतसर आंदोलनाचा इशारा देऊन मार्च महिन्यात स्वतंत्र सैनिकासह आंदोलन छेडणाऱ्या साळुंके सह आंदोलन कर्त्यांवरच प्रशासनांनी गुन्हे दाखल करून जेलमध्ये डामले जेलमधून बाहेर येऊन पुन्हा वाळू माफिया व त्यांना मदत करणारे प्रशासकीय अधिकारी यांच्याविरोधात न्यायालयीन लढा देणारे केदार साळुंके याना काही वाळू माफियाकडून कायमच जिवंत मारण्याचा कट रचला जात असल्याचे पत्र नुकतेच पोस्टाने मिळाले असून तशी रीतसर तक्रार साळुंखेनी पोलीस स्टेशनला दिलेली आहे.
     बिलोली तालुक्यातील गोदावरी नदी व मांजरा नदी पात्रातून हजार ब्रास रेती उत्खननाची परवानगी घेऊन लाखो बरास रेतीचे उत्खनन महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळू माफिया अवैध रेती उत्खनन करून सदरील मांजरा नदीतील लाल रेती  तेलंगणा व कर्नाटक राज्यात तर गोदावरीची काळी रेती महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात नेली जात असल्याचा अवैध प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन ,शासन दरबारी पाठपुरावा करूनही थांबत नसल्याने स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थासह आंदोलन छेडले असता प्रशासनानी अवैध रेती उत्खनन विरोधात कार्यवाही करण्याऐवजी आंदोलन कर्त्यांवरच खोटे गुन्हे दाखल करून मार्च महिन्यात साळुंकेसह 17 जणांना जेलमध्ये डांबले जेलची हवा खाल्याने आता आंदोलनकर्ते अवैध रेती उत्खननाकडे मान उचलणार नाहीत अशी वाळू माफिया व त्यांना मदत करणारे महसूल अधिकारी, कर्मचारी व राजकीय पुढारी यांची धारणा होती मात्र जेलमधून बाहेर येऊन साळुंकेनी पत्रकार परिषद घेऊन अवैध रेती उत्खनन विरोधात न्यायालयीन लढा देणार असल्याचे सांगितले होते व तशी कार्यवाही साळुंके यांनी चालवलेली आहे सदरील प्रकरणी मा. न्यायालयात, मा. हरित लवाद न्यायालय व शासन दरबारी दाद मागितली आहे त्यामुळेच आपणास जेलमध्ये पाठवूनही आपण कार्यवाही चालू ठेवल्यामुळे आता आपणास जिवंत संपवण्याचा कट रचल्या जात असल्याचे यापूर्वी माझ्या काही हितचिंतकांकडून कानावर येत होते मात्र नुकतीच मिळालेल्या पत्रांमधील मजकुरात केदार सोळके सर नमस्ते आपको बताना है कि आपको कुछ लोग मारना सोच रहे है राहेर और आटाळा कोळगावके रेती वाले है काही अस्पष्ट उल्लेख असून पुढे और कुछ है बस असे लिहून उर्दूमध्ये सही करून खाली राहेर असे लिहिलेले आहे त्यावरून जेलमध्ये पाठवूनही आपली कार्यवाही चालू असल्याने आता पुढची आपल्यावरील कार्यवाही जिवंत मारल्या शिवाय दुसरी कुठलीही नसल्याने आपल्या विरोधात वाळू माफिया काही प्रशासनातील अधिकारी व काही राजकीय पुढारी कट रचत असल्याचे या पत्रावरून दिसून येत असून सदरील प्रकरणी पोलिसात रीतसर तक्रार दिलेली आहे आपण क्रांतीकारी स्वतंत्र सैनिकांची अवलाद असून मरणास कधीच भीत नाही आणि भिऊन कार्यवाही मागे घेणार नसल्याची माहिती केदार पाटील साळुंके यांनी दिली आहे