अश्विन खांडेकर यांचा ‘उधाण’ काव्यसंग्रह प्रकाशित

0
14

सालेकसा,दि.10 : तालुक्यातील मनोहरभाई पटेल महाविद्यालय, सालेकसा येथील भूगोल विषयाचे प्राध्यापक अश्विन सुरेश खांडेकर हे साहित्यिक असून त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित आहेत. नुकतेच लाखनी येथे पार पडलेल्या दुसऱ्या वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलनात अश्विन खांडेकर यांचा ‘उधाण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटक माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मा.प. थोरात, पूर्व संमेलनाध्यक्ष विजयकुमार गवई, स्वागताध्यक्ष ह.ध. बोरकर, प्रा. सतेश्वर मोरे यांच्या हस्ते ‘उधाण’ काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला. यापूर्वी खांडेकर यांची तुझ्यात हरवलेला, ओठावर शब्द, ऋणानुबंध, तिमिरात जळणारे दिवे, झाडीबोलीतील झाडी माय, झाडीच्या पारंब्या अशी बरीच पुस्तके प्रकाशित झालेली असून ही त्यांची साहित्यातील कामगिरी गौरवास्पद आहे. या कार्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे..