मार्कंडाचे वनपाल रमेश बलैय्या लाच घेतांना जाळ्यात

0
9

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.११ः- जिल्ह्यातील चामार्शी तालुक्यातंर्गत येत रेंगावही उपक्षेत्र असलेल्या मार्कंडा (कं)येथील वनपाल रमेश पन्नू बलैया यांना आज 4० हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.आरोपी बलैय्या यांनी तक्रारदाराकडे वनगुन्ह्यात सवलत देण्यासाठी तसेच जप्त करण्यात आलेली मोटारसायकल सोडून देण्याकरीता तक्रारदारास १लाख २० हजाराची मागणी केली होती.परंतु तक्रारदारास ती रक्कम मुळीच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभाग गडचिरोलीकडे तक्रार नोंदवली.त्या तक्रारीच्या आधारे सापळा रचण्यात आला.मागणी केलेल्या रकमेपैकी 4० हजाराचा पहिला हप्ता घेत असतांना मार्कंडा जंगलपरिसरात पकडले.ही कारवाई पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधिक्षक राजेश दुददलवार,राजेंद्र नागरे,उपअधिक्षक डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक रवि राजुलवार,मोरेश्वर लाकडे,विठोबा साखरे,सत्यम लोहबरे,गणेश वासेकर,महेश कुकडकार,तुळशीदास नवघरे,घनश्याम वड्डेटीवार,सोनल आत्राम,सोनी तावडे आदींनी केली.