सरपंचपती ठरताहेत ग्राम विकासात अडसर-उपसरपंच बावनकर

0
12

गोंदिया,दि.12 : तालुक्यातील दांडेगाव येथील सरपंच बेबीनंदा विनोद चौरे व त्यांचे पती विनोद चौरे या ग्रामपंचायतच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असून, विकासकामात अडसर ठरत असल्याचा आरोप उपसरपंच हिरामण बावनकर यांनी ११ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
माहिती देताना त्यांनी सांगितले की सरपंच बेबीनंदा चौरे यांनी आपल्या स्वत:च्या नावाने बाराशे पन्नास रुपयांचे धनादेश स्वत:च्या नावाने काढून घेतल्याने त्यांच्यावर अपात्रतेची केस जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. याचप्रमाणे त्यांचे पती विनोद चौरे ग्रामपंचायत मध्ये येऊन बसून राहतात व शासनाच्या कामात ग्रामपंचायतच्या विकास कामात नेहमीच अडथडा निर्माण करतात. शासन परिपत्रकानुसार सरपंचाच्या नातेवाईकांना असे कुठलेही अधिकार नाहीत, यासंदर्भात मासिक सभा बैठकीत तसा ठरावही मंजूर करण्यात आला तरी मात्र हा प्रकार नियमित सुरू आहे. सरपंच चौरे या ग्रामपंचायत सदस्यांना विश्‍वासात न घेता व मासिक सभेत ते न ठेवता स्वत:च्या मनर्मजीने काम करीत आहेत. बावनकर यांनी त्या कामात गैरव्यवहार करीत असल्याचे सांगतांना हेटीटोला येथे नाली बांधकामाच्या बाबतीत ठक्कर बाप्पा आदिवासी सुधार योजनेअंतर्गत काम मंजूर करण्यासाठी पैशाची मागणी केली असल्याचाही आरोप केला. त्या कामात टक्केवारी मागून गैरव्यवहार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. गावाच्या विकास कामाच्या बाबतीत त्यांनी खंडविकास अधिकार्‍यांना चौदाव्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायतच्या कोणत्याही कामाला मंजुरी न देण्याबाबत पत्र व्यवहार केल्याचेही त्यांनी आरोप लावले आहे.