मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

स्पर्धा परिक्षेसाठी उदिष्ठ ठरवून घेणे महत्वाचे-जिल्हाधिकारी बलकवडे

गोंदिया,(खेमेंद्र कटरे), दि.१२ः-शासनाने जाहीर केलेल्या मेगा भरतीच्या अनुषंगाने प्रत्येक आठवड्यात स्पर्धा परिक्षेबाबत ङ्कशोध क्षमतेचा, ग्रामीण ऊर्जेचाङ्क ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून आज सामाजिक न्याय भवन येथे या व्याख्यानमालेचा शुभारंभ महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.कादबंरी बलकवडे यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे शुभारंभ झाले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,उपवनसरंक्षक एस.युवराज,उपविभागीय अधिकारी रqवद्र राठोड,कोषागार अधिकारी क्षिरसागर चहांदे,जातप्रमाणपत्र उपायुक्त देवसुदन धारगाये,समाजकल्याण उपायुक्त मंगेश वानखेडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या की आपल्याला आधी ठरवून घ्यायचे आहे की डॉक्टर व्हायचे की आयएएस,आयएपीएस.जोपर्यंत आपण हे ठरविणार नाही तोपर्यंत आपण आपल्या उदिष्ठ्यात यशस्वी होऊ शकत नाही.त्यातही आपल्याला का डॉक्टर,जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक व्हायचे आहे याची संकल्पना सुध्दा आपल्या मनात स्पष्ट झालेली पाहिजे तेव्हाच आपण स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून आपला उद्देश साध्य करु शकतो.आधीची परिस्थिती ही विपरीत होती.आजूबाजूचा परिसर आणि आपला अभ्यासाचे वातावरणात खुप अंतर असायचे मात्र आता परिस्थिती बदललेली आहे.अभ्यासासाठी चांगले वातावरण वाचनालयाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहे.चांगले शिकायला मिळाले आहे.या सर्व बाबींचा विचार करीत आपल्याला १० वी ते पदवीच्या काळातच आपले उदिष्ठ ठरवायचे आहे.त्यात तुम्हाला जो विषय आवडतो त्या विषयाच्या अनुषंगाने आपण आपल्या नोकरीच्या क्षेत्राची निवड करु शकता असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी विद्याथ्र्यांना आपल्या जिवनातील गोष्टींची माहिती देत मार्गदर्शन केले.यामध्ये उपविभागीय अधिकारी रqवद्र राठोड यांनी आपण आधी मंत्रालयात काम करीत होते नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली आणि उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांना खुप संधी असून मनात मात्र ईच्छाशक्ती व महत्वाकांक्षा असणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी आपण तेलगंणा राज्यातील छोट्याश्या गावातून आलो आहे.युपीएससी करण्यासाठी प्रथम आपले पदवीचे अभ्यासक्रम पुर्ण झालेले पाहिजे असे सांगत ज्या परिक्षेची तयारी करायची आहे.त्या परिक्षेचा अभ्यासक्रम आधी निट तपासून घेतल्यानंतर त्यातील नेमके काय महत्वाचे आहे हेच आपल्याला कळणे महत्वाचे आहे.प्रत्येक परिक्षेचा विषय व महत्व वेगळा असतो त्यासाठी आपल्या मनात एक निश्चितता आवश्यक आहे.आजच्या काळात सोशल मिडियासह तंत्रज्ञानाचा वापरही महत्वाचा झालेला असल्याचे सांगितले.
उपवनसंरक्षक एस.युवराज म्हणाले की,मी ज्या तामिळनाडू राज्यातील गावातून आलो त्यावेळी माझ्या गावात विज नव्हती,अशा परिस्थितीत मी अभ्यास केलेला आहे.पण ज्या महाविद्यालयात मला शिक्षण घेण्याची संधी मिळाली.त्या महाविद्यालयातून दरवर्षी किमान २५ विद्यार्थी हे युपीएससीच्या परिक्षेला बसतात आणि उत्तीर्ण होतात.त्यासाठी आपणास आधी ठरवून घ्यायचे आहे की मला युपीएससी करायचे की एमपीएससी त्याप्रमाणे आपला अभ्यास निवडणे गरजेचे आहे.या सर्व परिक्षा १०० टक्के पारदर्शक असल्यामुळेच ग्रामीण भागातील मुलेही आता जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक बनू लागली आहेत.हे बनण्यासाठी आपली मात्र मनापासून वैचारिक तयारी हवी आहे.
कोषागार अधिकारी क्षिरसागर चहांदे यांनी आपण मुळचे एकाच जिल्ह्यातील असून आपल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील युवकामध्ये मोठ्याप्रमाणात क्षमता आहे.मात्र स्पर्धा परिक्षेसंबधी योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने या दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी पाहिजे त्याप्रमाणात एमपीएससी व युपीएससीच्या परीक्षेकडे वळलेला नसल्याची खंत व्यक्त केली.आपल्या काळात कुणीही मार्गदर्शन करणारे नव्हते परंतु आता मार्गदर्शन करणारे व्यक्ती असल्याने युवकांनी त्यांच्या लाभ घेत स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी आपल्या बुध्दीमतेचा वापर करायला पाहिजे.यावेळी बोलतांना उपायुक्त देवसुदन धारगाये यांनी विद्याथ्र्यांना वाचनासाठी वाचनालयाची संधी उपलब्ध झालेली आहे.त्या वाचनालयाचा वापर आपण कशाप्रकारे करतो त्यावरच आपला निकाल अवलंबून असल्याचे सांगत गोंदियाच्या जिल्हा ग्रंथालयासाठी जिल्हाप्रशासनाने जागा उपलब्ध करुन द्यावी अशी विनंती केली.जिल्हाधिकारी मॅडम यांनी यासाठी दिलेल्या वेळेचा विद्याथ्र्यांनी पुरेपुर लाभ घ्यावा असेही म्हणाले.यावेळी उपस्थित विद्याथ्र्यांनीही आपल्या समस्या मांडत प्रश्नांच्या माध्यमातून माहिती जाणून घेतली.संचालन समाजकल्याण उपायुक्त मंगेश वानखेडे यांनी केले.
Share