तालुक्यातील कटंगी येथील युवकांचा शिवसेनेत प्रवेश

0
9

गोंदिया,दि.१4-गोंदिया जिल्हा शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष पदाची मुकेश शिवहरे यांनी सुत्रे हाती घेतल्यानंतर गोंदिया विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला प्रत्येक गावापर्यंत पोचवून बुथ कमिटीवर भर दिल्याने गावपातळीवर शिवसेनेमध्ये सहभागी होणाèया युवकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागलेली आहे.गोंदिया विधानसभा मतदारसंघातील ३६० बुथवर बुथकमिटी तयार करण्याच्या मोहिमेतंर्गत जवळीच कटंगी येथील विविध पक्षातील युवकांनी शिवसेना विदर्भ संपर्कप्रमुख विनायक राऊत,जिल्हा संपर्कप्रमुख निलेश धुमाळ,जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश घेतला.त्यामध्ये प्रणित सिंह बैस, दिलीप मोहकर, शैलेश माहूले, संजय उके, राम बनाने, सूरज ठाकुर, राजेश राऊत, गौरव भागडकर, मिथुन तैयकर, प्रितम नांदने, अनील कंरडे, राकेश लिलहारे, चतरु मोहनकर यांचा समावेश आहे.यावेळी उपजिल्हाप्रमुख तेजराम मोरघडे,शहरप्रमुखसह इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.