पळसगाव येथे स्वच्छता दिंडी द्वारे जनजागृती

0
35

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता प्रभाग स्पर्धेसाठी गाव सज्ज

सडक अर्जुनी,दि.14ः- तालुक्यातील ग्राम पंचायत व जि. प. वरिष्ठ प्राथ. शाळा पळसगावच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसफाई दिंडीचे आयोजन शनिवारला करण्यात आले होते. स्वच्छतेचे प्रणेते वंदनीय संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा गांधीजी यांच्या वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी तथा ग्रामस्थ स्वच्छता दिंडीचे खास आकर्षण होते. कार्यानुभव विषयातंर्गत स्वनिर्मित उपक्रमातून शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या झाडूमधून उत्कृष्ट अशा तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. सरपंच सुभाष कापगते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाष्कर मानकर अध्यक्ष,उपाध्यक्ष धनराज येरपुडे उपाध्यक्ष, शाळा व्यव. समितीचे सदस्य, ग्रामपंचायतचे सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छतेत चांगले कार्य करणार्या विद्यार्थ्याना पुरस्कार वितरित करण्यात आले. शाळेपासून स्वच्छता दिंडीला प्रारंभ झाला. विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या झाडूच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात खूपच मदत झाली. एकाच वेळी शेकडो हात स्वच्छतेसाठी पुढे सरसावले. पाहता पाहता गावातील अख्खे रस्ते स्वच्छ झाले. हा चमत्कार घडला तो स्वच्छता दिंडीतून. सर्वांच्या सहकार्यातून कठिण कार्यही सोपे होते. हा संदेश देण्यात आला तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आजची ही स्वच्छता दिंडी यशस्वी ठरली. ही दिंडी यशस्वी होण्यासाठी ग्राम पंचायत , जि. प. शाळा पळसगाव येथील विद्यार्थी, मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अथक परिश्रम घेतले.