जादूटोणा हे समाजाला घातकच- डॉ. प्रकाश धोटे

0
9
सालेकसा(पराग कटरे),दि.15ः-देश हा झपाट्याने आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. पण त्याचबरोबर जादूटोणा,  अंधश्रद्धेचा मोठा पगडा अजूनही समाज व्यवस्थेवर आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज आज पाहिजे ज्या पद्धतीने आपला विकास करू शकत नाही.त्यामुळेच जादूटोणा हे समाजाला घातकच असल्याचे प्रतिपादन डॉक्टर प्रकाश धोटे यांनी केले. ते युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र गोंदियाशी संलग्नित जागृती नवयुवक मंडळ बापुटोला(सालईटोला) तसेच जागृत शेतकरी  ग्रामोत्थान माता मंदिर ट्रस्ट सालईटोला यांच्या द्वारा नवरात्री उत्सवानिमित्त आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमात विशेष मार्गदर्शक म्हणून बोलत होते. धोटे यांनी बुवाबाजी विषयक सविस्तर मार्गदर्शन करून त्यांची हातचलाखी कशी असते यावर विविध प्रयोग करून दाखवून उपस्थितांना योग्य ते प्रबोधन केले.
         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गांधीला ग्रामपंचायतचे सरपंच गजानन राणे हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक व अतिथी म्हणून यशवंत कावळे,बापूटोला येथील पोलीस पाटील सौ. सपना शेंडे, ग्रामपंचायतचे उपसरपंच अरविंद फुंडे, हे उपस्थित होते.संचालन व आभार जागृती नवयुवक मंडळ चे सचिव पवन पाथोडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत सदस्य मुकेश शेंडे, पार्थसिंह बैस, जेठालजी फटिक ,मोहनसिंग कनपुरिया, अरुण लांजेवार,दुलीचंद फुंडे, श्यामरावसिंह चौव्हान,दुलीचंद सोनकनेवरे, प्रियंका फटिक यांनी परिश्रम घेतले