भारताला महासत्ता बनवायचे असेल तर वाचना शिवाय पर्याय नाही-मनोहरराव चंद्रिकापुरे

0
15

गोरेगाव,दि.१६ः-तालुक्यातील आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी(अ)येथे वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मार्गदर्शक म्हणून बोलतांना सेवानिवृत्त कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले की ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी बालवयापासूनच आपले लक्ष्य ठरवून घेतले होते.त्यासाठी त्यांनी वाचनाला महत्व दिले होते.वाचनाच्या माध्यमातूनच त्यांनी आपया यशाची शिखरे गाठली.त्यामुळे त्यांच्या विचाराचा भारत घडविण्यासाठी वाचनाशिवाय पर्याय नाही.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका भाजप अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत होते.अतिथी म्हणून प्राचार्य आर.बी.गुप्ता,बाबाभाऊ बहेकार,प्रा.सचिन नांदगाये,तंटामुक्त अध्यक्ष योगराज भोयर,उपसरपंच प्रभुदास बघेले,शिवाजी वाचनालय गौरीटोलाचे सचिव एल.पी.रांहागडाले,ग्रंथालयचे अध्यक्ष ग.तु पटले,सचिव वाय.डी.चौरागडे उपस्थित होते.
पुढे बोलतांना चंद्रिकापुरे म्हणाले की,२१ वे शतक इंटरनेटचे समजले जाते. वाचन नियमित व भरपुर असल्यास कोणताही विषय समजण्यास सोपा जातो.तसेच महापुरुष डॉ. बाबासाहेब आबेंडकर,महात्मा ज्योतिबा फुले,डॉ.कलाम यांचे चरित्र वाचल्यानतंर कर्तव्य,देशप्रेम, साधेपना,साहस पराक्रम अनेक गोष्टीचे संस्कार बालमनावर आपोअप होतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष भगत म्हणाले की वाचनाने मनाची एकाग्रता वाढते आणि व्यक्तिला ८० टक्के ज्ञान हे पुस्तकातूनच प्राप्त होते.
गांवकरी,शालेय मुला -मुलीनी ग्रंथाचे वाचन केल्यास त्यांनी ठरविलेले भविष्य प्राप्त करण्यास अडचण जाणार नाही.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. ग्रंथालयाकडून ज्येष्ट नागरिक व उत्कृष्ट वाचक यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्तविक संस्थेचे साचिव वाय.डी.चौरागडे यांनी केले. संचालन डि.आर.चौरागडे यांनी तर आभार ग्रंथपाल नरेन्द्रकुमार चौरागडे यांनी मानले.आयोजनासाठी उपाध्यक्ष मदनलाल बघेले,देवदास चचाने,जे. जे. पटले, सुभाष चौरागडे यांच्यासह तुषार डोगंरे, दुर्गेश चचाने, प्रविण येरखडे, कैलाश गौतम आदिनी सहकार्य केले.