तिरोडा तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा

0
10
तिरोडा,दि.१६ः:  गोंदिया  जिल्ह्यातील  तिरोडा  तालुक्यात  गेल्या दोन वर्षापासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती असून यावर्षी ही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस न झाल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसह पिकाला पानी मिळेनासे झाले आहे.
मुंडीकोटा, सरांडी, जिल्हा परिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पिके करपली गेली असून शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने तिरोडा तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करावे यासाठी आमदार, खासदारांनी प्रयत्न करावे अशी मागणी सेलोटपार परिसरातील नागरिकांसह खुशाल शेंडे यांनी केली आहे.शेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारने जे तालुके दुष्काळग्रस्त जाहिर केले. त्यामध्ये तिरोडा तालुक्याचा समावेश नाही. मात्र या तालुक्यातील सेलोटपार,मनोरा,केसलवाडा,बयवाडा,मुरपार, खैरी,नवेझरी, मुरमाडी, सीतेपार, खेडेपार,नवेगाव  या गावांच्या परिसरातील धान पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचीही समस्या उद्भवू लागल्याने दुष्काळग्रस्त तालुक्यात तिरोड्याचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे.