स्वच्छता पंधरवाड्याला जिल्हा परिषदेत शुभारंभ

0
9
गोंदिया,दि.१६ः: जिल्हा परिषदेतील कार्यालयात स्वच्छता राखण्यासाठी शनिवार (दि.१३) कार्यालयीन स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. जिल्हा परिषदेतील १७ विभागातील कर्मचाèयांनी यात भाग घेवून आपले कार्यालय स्वच्छ केले. सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयात स्वच्छता राहावी, कार्यलयातील वातावरण आनंदी राहावे, यासाठी १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील कर्मचारी कार्यालयीन स्वच्छत  उपक्रमात सहभागी झाले. उपक्रमा दरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सामान्य प्रशासन विभागाचे ््उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके यांनी जिल्हा परिषदेतील सर्वच विभागांना भेटी देवून उपक्रमांची पाहणी केली. स्वच्छतेमुळे आपले आरोग्य अबाधित राखले जाते. सोबतच स्वच्छ ठिकाणात मानसिक आनंद मिळत असल्याने आपल्या कार्यक्षमतेत सुद्धा चांगलीच वाढ होते. त्यामुळे कार्यालयीन स्वच्छता करणाèया कर्मचाèयांची प्रशंसा करुन त्यांना नेहमीच स्वच्छता राखण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भेटी दरम्यान केले. कार्यालयातील जागेत पोषक वातावररण निर्माण करण्यासाठी नस्ती, ऑफिस, फाईल्स/कागदपत्रे सुयोग्य पद्धतीने ठेवण्याचे कार्य कर्मचाèयांनी केले. याशिवाय कार्यालयातील आपले बैठक जागेसह पॅसेज, पायèया देखील स्वच्छ करण्यात आल्या.
कार्यालयातील संगणक, पंखे, टेबल, कपाटांची सुद्धा स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे कार्यालयीन अभिलेख, दस्ताऐवजांचे नियमानुसार नोंदणीकरण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार दस्तऐवजांचे qनदणीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कार्यालयीन वातावरण आल्हादायक झाल्याचे दिसून येत आहे. स्वच्छता पंधरवाड्याच्या यशस्वितेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दिवाकर खोब्रागडे, विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांच्यासह जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचाèयांनी परिश्रम घेतले.
कर्मचाèयांना बदली रजा
शनिवारी शासकीय सुट्टी होती. मात्र कार्यालयीन स्वच्छता उपक्रमासाठी सुट्टीच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहणाèया कर्मचाèयांना बदली रजा देण्याचे शासनाच्या परिपत्रातून निर्देश देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागी झाले.