मुख्य बातम्या:
खजरी/डोंगरगांव येथील आदिवासी विकास विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात# #मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी द्यावी-ऊर्जामंत्री# #एक शाम राष्ट्र के नाम' कवि संमेलन आज - भाजयुमोचे आयोजन# #तिरंग्या”नं दिला स्वयंरोजगार ! बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात# #अर्जुनी मोर व साकोली पं.स.च्या नव्या इमारत बांधकामाला मंजुरी# #सिरोंचा येथील युवकांची राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता निवड# #संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला# #समाजाच्या प्रगतीसाठी संघठीत होणे गरजेचे : खनिज मंत्री जायसवाल# #स्वच्छ शौचालय स्पर्धेत सहभागी होऊन पुरस्कार मिळावा# #आर्थिक लाभासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी,शासनाची दिशाभूल-राकेश ठाकुर

पोलिसांनी काढली हेल्मेटकरीता मोटारसायकल रॅली

गोंदिया, दि.१७: शहरातील नागरिकांना हेल्मेट संदर्भात जागृत करण्यासाठी मंगळवारी (दि.१६) सकाळी ११ वाजता जिल्हा वाहतूक पोलिसांच्यावतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत १५० पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.या रॅलीचे नेतृत्व पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी केले.
गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी १५० जण रस्ता अपघातात मृत्यू पावतात.त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात. रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्तीचां अवकाळी मृत्यू होतो.वाहन चालक प्राणास मुकू नये यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे १५ आॅक्टोबरपासून सक्तीचे करण्यात आले होते.
परंतु गोंदियाच्या बाजारात हेल्मेटचा तुटवडा असल्याने हेल्मेट सक्ती तीन दिवस उशीरा सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी गोंदिया शहरातील वाहन चालकांना जागृत करण्यासाठी मनोहर चौक गोंदिया येथून रॅली काढण्यात आली. रॅली मुख्य बाजारपेठ, रामनगर सिव्हील लाईन होत वाहतूक शाखेत पोहचली. या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक महिपालसिंह चांदा, पोलीस निरीक्षक हेमने, मनोहर दाभाडे, घोटेकर, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय सिंग, संदीप चव्हाण, गणेश धुमाळ, बघेल, मेश्राम, ३६ पोलीस कर्मचारी, पोलीस मुख्यालयाचे ४० कर्मचारी, गोंदिया शहर ठाण्यातील ८ कर्मचारी, रामनगरचे ५ कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे ५ कर्मचारी व इतर २५ लोक असे १५० लोक रॅलीत सहभागी झाले होते.

Share