वाचनाने व्यक्तिमत्त्व घडत जाते : किरण भैरम

0
12
मोहाडी(नितिन लिल्हारे)दि.17 : डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम हे गरीब कुटुंबातील एक मुलगा परिस्थितीतुन पुढे येऊन शिक्षण घेऊन भारताच्या इतिहासात एक अजरामर व्यक्ती होऊन गेले,  शिक्षण हे खूप महत्वाचे आहे. जो शिकेल तो वाचेल, वाचाल तर वाचाल, डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांना वाचनाची गोडी, छंद होता म्हणून आपल्या देशाचे वैज्ञानिक झाले. भारताच्या संरक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य असून त्यांचे कार्य खूप महान आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहिले, वाचनाने व्यक्तिमत्त्व घडत असते, डॉ कलाम यांचे जीवन, आदर्श नक्कीच आपल्याला एक आदर्श देऊन जाते लहान वयातच मुलांना योग्य तो संस्कार मिळावे असे विचार सोसायटी ज्युनिअर कॉलेज उसर्रा येथे वाचन-प्रेरणा दिन जागतीक विद्यार्थी दिनप्रसंगी पंचायत समिती सदस्य किरण किशोर भैरम यांनी व्यक्त केले.यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधून आगळा वेगळा प्रयोग करून स्वयंसिध्दांत व संस्काराची पाऊलवाट ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.
१५ ऑक्टोबरला सोसायटी ज्युनिअर कॉलेज उसर्रा, जिल्हा परिषद शाळा ताडगाव, जिल्हा परिषद शाळा धोप, जिल्हा परिषद शाळा, टाकला, काटेबाम्हणी, टांगा, सिहरी, व प. स. उसर्रा क्षेत्रातील सर्व शाळेत डॉ ए.पि.जे अब्दुल कलाम यांचा जयंतीनिमित्त वाचन-प्रेरणा दिन, जागतीक विद्यार्थी दिन व किरण भैरम प. स. सदस्य यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व शाळेमध्ये स्वयंसिध्दांत व संस्काराची पाऊलवाट या पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले.  मुख्याध्यापक डोंगरे उसर्रा, मुख्याध्यापक सोनवाने टाकला, मुख्याध्यापिका भगत काटेबाम्हणी, मुख्याध्यापक मारबते टांगा ,मुख्याध्यापक अवार्ड सालई खुर्द,मुख्याध्यापक इडपाते जि.प.शाळा उसर्रा, रहांगडाले, केंद्र प्रमुख भगत, मुख्याध्यापक भट्ट ताडगाव, बोंदरे, इडपाते, विध्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते.