आशीष देशमुख यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
11

नागपूर,दि.17ः -जिल्ह्यातील काटोल येथील भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी आज काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मला घरी परतल्यासारखे वाटत आहे, अशी प्रतिक्रिया आशीष देशमुख यांनी ट्वीटर वरुन व्यक्त केली आहे.आशीष देशमुख यांनी नुकताच भाजपला रामराम केला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये जाणार असे बोलले जात होते. अखेर आज सकाळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आशीष देशमुख यांच्या बरोबरच भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंतसिंह यांचे पूत्र मानवेंद्र सिंह यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आशीष देशमुख गेले काही महिने भाजपवर सातत्याने टीका करत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपच्या शेतकरी धोरणांच्या विरोधात ठिय्या आंदोलनही केले होते.