आदिवासी गोवारी समाजाचे सत्याग्रह आंदोलन १९ रोजी

0
17

गोंदिया दि.१८:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला न्याय द्यावा, यासाठी आदिवासी गोवारी समाज संघटनांच्या वतीने सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. त्यानुरूप १९ ऑक्टोबर रोजी सत्याग्रह आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
आदिवासी गोवारी जमातीचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक संस्था, संघटनांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र शासन गोवारी समाजाला न्याय देण्यास टाळाटाळ करीत आहे. शासनाने निर्णयाची अंबलबजावणी तत्काळ करावी व गोवारी जमातीला न्याय द्यावा म्हणून समन्वय समितीच्या वतीने २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यात सत्याग्रह आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तर आता दुसर्‍या टप्प्यात १९ ऑक्टोबर रोजी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. या आंदोलन समाजबांधवांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन आदिवासी गोवारी समाज समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.