अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात

0
17

गोंदिया दि.१९: : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट हे २० व २१ आक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. २० ऑक्टोंबरला दुपारी ३.३० वाजता भंडारा येथून मोटारीने देवरी कडे प्रयाण. दुपारी ४.१५ वाजता देवरी येथे आगमन व देवरी येथील धान खरेदी केंद्र व राईस मिलला भेट. सायंकाळी ६ वाजता गोंदिया कडे प्रयाण. सायंकाळी ७ वाजता विश्राम भवन गोंदिया येथे आगमन, राखीव व मुक्काम.
२१ ऑक्टोंबरला सकाळी १० वाजेपर्यंत विश्राम भवन गोंदिया येथे राखीव. सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पुरवठा विभाग-संगणकीकरण कामाचा आढावा. सकाळी १०.३० ते दुपारी १२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील खासदार व सर्व आमदार यांचेसमवेत धान खरेदी संदर्भात बैठक. दुपारी १२ ते २ पर्यंत विश्राम भवन येथे अभ्यागतांना भेटीसाठी राखीव. दुपारी २ ते ३ पर्यंत उथउ गोदामांना भेट. दुपारी ३ ते ४ पर्यंत ढऊउ व चरीज्ञशींळपस ऋशवशीरींळेप खरेदी केंद्राची पाहणी. दुपारी ४ वाजता नागपूर कडे प्रयाण करतील.