न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी

0
61

गोंदिया दि.१९:: उच्च न्यायालयाने नुकतेच गोवारी हे आदिवासीच असल्याचे निर्वाळा दिला. मात्र शासनाने न्यायालयाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे शासनाने न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करून गोवारी समाजाला न्याय द्यावा, यासाठी आदिवासी गोवारी समाज संघटनांच्या वतीने सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील गोवारी समाज संघटनेच्यावतीने आज १९ ऑक्टोबर रोजी फूलचूर नाका येथून भव्य अशा मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले.आदिवासी गोवारी जमात संघटनेचे गोंदिया जिल्हा मुख्य समन्वयक गुलाबराव नेवारे, टेकचंद चौधरी,ज्ञानेश्वर राऊत,मोहन सहारे,प्रमिलाताई सोनवाने,शंकर खेकरे आदींच्या नेतृत्वात हा निघालेल्या मोर्च्यात गोवारी समाजबांधवानी आपल्या पारंपारिक वाद्यांसह वेशभुषा करुन प्रशासनासह जनतेचेही लक्ष वेधले होते.आंदोलनांतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फेत राज्याचे राज्यपाल,मुख्यमंत्री व मुख्य सचिवांच्या नावे असलेले निवेदन देण्यात आले.
आदिवासी गोवारी जमातीचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक संस्था, संघटनांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र शासन गोवारी समाजाला न्याय देण्यास टाळाटाळ करीत आहे. शासनाने निर्णयाची अंबलबजावणी तत्काळ करावी व गोवारी जमातीला न्याय द्यावा म्हणून समन्वय समितीच्या वतीने २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्यात सत्याग्रह आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते. तर दुसर्‍या टप्प्यात १९ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर सत्याग्रह आंदोलन करुन जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करुन गोवारी समाजाला न्यायालयीन निर्णयानुसार आदिवासी समाजाचे अधिकार देण्याची मागणी करण्यात आली

या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी आदिवासी गोवारी समाज समन्वय समितीेचे प्रसिध्दीप्रमुख संजय राऊत,पी.जी.शहारे,सत्याग्रह सुरक्षा समिती प्रमुख प्रमोद शहारे,सुशील राऊत,किशोर शहारे,गुड्डूभाऊ नेवारे,विजु भोयर,प्रविण चौधरी,अनिल नेवारे,रत्नाकर चौधरी,रवि भोयर, बंटी नेवारे,नविन काळसर्पे,दिनेश सेवकराम कोहरे,सोनू नागोसे,महेश शेंदरे,दिनेश कोहरे,अतुल चौधरी,रितेश वाघाडे,पवन काळसर्पे, राहूल शहारे,मुकेश कोहळे,महेंद्र गाते, संजु कवरे,संतोष नेवारे,सोनू वाघाडे,निकेश नेवारे,रितेश नेवारे,दुर्गेश वघारे,तुषार भोयर, अरूण वघारे,मंगेश नेवारे, कुणाल नेवारे, आदित्य नेवारे,मनोज नेवारे, राजेश सोनवाने यांच्यासह सर्व तालुका कार्यकारीणी पदाधिकारी यांनी सहकार्य केले.